India Tour of West Indies 2022 : सध्या इंग्लंड दौऱ्यावर असणारा भारतीय संघ याच महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादीत षटकांचे सामने खेळणार आहे. दरम्यान याच मालिकेतील टी20 सामन्यांसाठी नुकताच भारतीय संघ जाहीर झाला आहे. यावेळी संघाचं नेतृत्त्व रोहित शर्माच करणार असून विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे दिग्गज मात्र संघात नसणार आहेत. तसंच केएल राहुल आणि कुलदीप यादव यांचं संघात पुनरागमन झालं असलं तरी त्यांच्या फिटनेसवर ते अंतिम 11 मध्ये असणार की नाही हे ठरणार आहे. बीसीसीआयने नुकताच संघ ट्वीट करत जाहीर केला आहे.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, केएल राहुल, सूर्याकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.

 

या दौऱ्यात भारतीय संघ आधी तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यानंतर पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने तीन वेगवेगळ्या ठिकाणी खेळवले जातील. 29 जुलै रोजी पहिला T20 ब्रायन लारा क्रिकेट अकादमी (पोर्ट ऑफ स्पेन) येथे खेळवला जाईल. त्यानंतर दुसरा आणि तिसरा टी-20 सामना वॉर्नर पार्कवर होणार आहे. त्यानंतर या मालिकेतील अखेरचे दोन टी-20 सामने 6 आणि 7 ऑगस्ट रोजी लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळवले जातील.

कसं आहे टी-20 मालिकेचं वेळापत्रक?

 

सामना तारिख ठिकाण
पहिला टी-20 सामना  29 जुलै 2022 पोर्ट ऑफ स्पेन
दुसरा टी-20 सामना 1 ऑगस्ट 2022 सेंट किट्स आणि नेव्हिस
तिसरा टी-20 सामना 2 ऑगस्ट 2022 सेंट किट्स आणि नेव्हिस
चौथा टी-20 सामना 6 ऑगस्ट 2022 फ्लोरिडा, अमेरिका
पाचवा टी-20 सामना 7 ऑगस्ट 2022 फ्लोरिडा, अमेरिका

(सर्व टी-20 सामने भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होतील.)

हे देखील वाचा-