KL Rahul in Team India : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर (India Tour Of England) असून कसोटी सामना अनिर्णीत ठरल्यानंतर भारताने टी20 मालिकेत 2-1 ने विजय मिळवला. आता एकदिवसीय मालिका सुरु असून या दौऱ्यात भारत कमाल कामगिरी करत आहे. पण यातच भारताचा उत्तम दर्जाचा फलंदाज केएल राहुल (KL Rahul) सध्या भारतीय संघात नसून त्याची नुकतीच एक शस्त्रक्रिया झाल्याने तो संघाबाहेर आहे. पण आता लवकरच राहुल संघात पुनरागमन करणार अशी माहिती समोर येत आहे, कारण राहुलने बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सरावाला सुरुवात केली असून त्याने सरावाचा एक व्हिडीओही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.






 


राहुलने काही महिन्यांपूर्वी जर्मनी येथे हर्नियाचं ऑपरेशन केलं. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आता त्याने हळूहळू सरावाला सुरुवात केली आहे. राहुलला आयपीएलनंतर दुखापत झाली होती. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार राहुल बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अकादमीत सराव करत आहे. त्यामुळे आगामी आशिया कपमध्ये राहुल संघात पुनरागमन करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेपूर्वी राहुल दुखापतग्रस्त


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी केएल राहुलची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. पण मालिका सुरू होण्यापूर्वी केएल राहुलला दुखापत झाली. ज्यामुळं त्याला या मालिकेतून बाहेर पडावं लागलं होतं. केएल राहुलच्या जागी ऋषभ पंतकडं संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.


हे देखील वाचा-