World Cup Super League Points Table : पुढील वर्षी 50 षटकांचा एकदिवसीय विश्वचषक (World Cup 2023) खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे ही भव्य स्पर्धा भारतात पार पडणार असून चौथ्यांदा भारत विश्वचषकाच यजमानपद भूषवणार आहे. याआधी भारतात 1987, 1996 आणि 2011 साली 50 षटकांच्या एकदिवसीय विश्वचषकाचं आयोजन झालं होतं. याआधी अखेरीस म्हणजे 2011 मध्ये भारताने 50 ओव्हरच्या चषकाचे आयोजन केले होते, तेव्हा भारताने महेंद्र सिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्त्वाखाली विश्वचषक जिंकला होता.
टॉप-8 मध्ये थेट मिळेल पात्रता
2023 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये 8 संघ सहभागी होणार असून यावेळी आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीगच्या गुणतालिकेतील टॉप-8 संघ थेट वर्ल्ड कपसाठी क्वॉलीफाय करणार आहेत. सध्या या गुणतालिकेचा विचार करता मागील वेळी झालेला 2019 चा विश्वचषक जिंकणारा इंग्लंडचा संघ यावेळी अव्वल स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलिया 8 व्या स्थानी आहे. इंग्लंडने 18 सामने खेळत 125 गुण मिळवले आहेत.
भारत गुणतालिकेत 7 व्या क्रमांकावर
वर्ल्ड कप सुपर लीगच्या (World Cup Super League) गुणतालिकेत भारतीय संघ सध्या सातव्या नंबरवर आहे. भारताने 12 सामने खेळत 79 गुण मिळवले आहेत. तर 1996 साली वर्ल्ड कप जिंकणारा श्रीलंकेचा (Sri Lanka) संघ सध्या 10 व्या नंबरवर आहे. विशेष म्हणजे भारतीय संघ टॉप-8 मध्ये नसेल तरी टॉप-7 संघासह भारतही पात्रता मिळवेल, कारण ही स्पर्धा यंदा भारतात होत आहे. सध्या टॉप 8 मध्ये इंग्लंडसह बांग्लादेश, अफगानिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आहेत.
हे देखील वाचा-
- Legends League : हरभजन सिंह पुन्हा मैदानात, 'हे' भारतीय देखील उतरणार लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये, वाचा सविस्तर
- ENG vs IND, 2nd ODI : भारतीय फलंदाजी ढासळली, 100 धावांनी इंग्लंड विजयी, मालिका 1-1 ने बरोबरीत
- IND vs WI T20 Squad : वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय टी20 संघाची घोषणा, कोहली-बुमराह संघात नाही, कसा आहे संपूर्ण स्कॉड?