Saudi T20 League : 34 हजार कोटींची टी-20 लीग सुरू होण्यापूर्वीच पडणार बंद? BCCI आणि ECB एकत्र आले, थेट ICC दरबारी दाद मागितली
बीसीसीआय आणि ईसीबीने संयुक्तपणे सौदी टी-20 लीगला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, दोन्ही बोर्ड त्यांच्या खेळाडूंना या लीगमध्ये खेळण्यासाठी एनओसी देणार नाहीत.

BCCI and ECB vs Saudi T20 League : दुनियाभरातील क्रिकेट लीगवर आता एक नवखा धोका निर्माण झाला आहे. हा धोका म्हणजे सौदी अरेबियाने प्रस्तावित केलेली सुपर-लीग. या लीगच्या आगमनाने आयपीएल आणि द हंड्रेडला सर्वात जास्त फटका बसू शकतो. आयपीएल आणि द हंड्रेडला कमकुवत करण्याच्या या प्रयत्नाविरुद्ध भारत आणि इंग्लंडने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. इंग्लंडमध्ये भारतीय क्रिकेट मंडळाने या लीगच्या विरोधात एकत्र येऊन योजनेवर काम सुरू केले आहे. तर दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया हा अरबो डॉलरच्या या लीगमधून फायदा मिळवण्यास तयार आहे.
BCCI आणि ECB एकत्र आले अन्...
ब्रिटिश वृत्तपत्र 'द गार्डियन' च्या वृत्तानुसार, भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डांनी सौदी अरेबियाच्या प्रस्तावित टी-20 लीगविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे. लॉर्ड्स येथे खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत बीसीसीआय आणि ईसीबीच्या उच्च अधिकाऱ्यांमध्ये या मुद्द्यावर चर्चा झाली, त्यानंतर दोन्ही बोर्ड या नवीन लीगला पाठिंबा देणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला.
दोन्ही बोर्डांनी असेही ठरवले आहे की, ते त्यांचे खेळाडू या लीगमध्ये खेळण्यासाठी पाठवणार नाहीत. बोर्ड खेळाडूंना मान्यता देणार नाही. म्हणजेच, बोर्डाकडून एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) दिले जाणार नाही. याशिवाय, बीसीसीआय आणि ईसीबी एकत्रितपणे आयसीसीवर दबाव आणतील जेणेकरून ते या लीगला कोणत्याही प्रकारची अधिकृत मान्यता देऊ नये.
ऑस्ट्रेलिया लीगच्या समर्थनात
भारत आणि इंग्लंड या टी-20 लीगला विरोध करत असताना, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा निर्णय पूर्णपणे वेगळा आहे. अहवालानुसार, ऑस्ट्रेलिया या लीगमध्ये सौदी गुंतवणूकदारांसोबत भागीदारी करण्यास तयार आहे. ऑस्ट्रेलियासाठी त्यांच्या क्रिकेट फॉरमॅटमध्ये खाजगी गुंतवणूक आणण्याची ही एक संधी आहे, कारण सध्या बिग बॅश लीगवर प्रशासकीय संस्था आणि राज्य संघटनांचा अधिकार आहे.
400 दशलक्ष डॉलर्स आणि ग्रँड स्लॅमसारखे फॉरमॅट
सौदी अरेबियाची ही प्रस्तावित टी-20 लीग एसआरजे (एसआरजे स्पोर्ट्स इन्व्हेस्टमेंट्स) द्वारे सुरू केली जाऊ शकते, कारण एसआरजे या लीगमध्ये 400 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 3442 कोटी रुपये भारतीय रुपयांमध्ये गुंतवण्यास तयार आहे. या लीगमध्ये 8 संघ असतील जे दरवर्षी वेगवेगळ्या मैदानांवर चार स्पर्धा खेळतील. ही लीग अगदी टेनिसच्या ग्रँड स्लॅमसारखी असेल.
इतके वेगळे स्वरूप आणि इतका पैसे एकत्र आला तर लीगसाठी मोठा धोका बनू शकतात. म्हणूनच बीसीसीआय आणि ईसीबीने आधीच त्याविरुद्ध रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
हे ही वाचा-





















