![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rishabh Pant : भारताला ऋषभ पंतची उणीव भासेल, ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी खेळाडूचा दावा
IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत पंत सहभागी होणार नाही ही ऑस्ट्रेलियन संघासाठी चांगली बाब असल्याचंही या खेळाडूने सांगितलं.
![Rishabh Pant : भारताला ऋषभ पंतची उणीव भासेल, ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी खेळाडूचा दावा Australias Ex captain ian chappell says Team India will miss rishabh Pant in IND vs AUS Series Rishabh Pant : भारताला ऋषभ पंतची उणीव भासेल, ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी खेळाडूचा दावा](https://static.abplive.com/wp-content/uploads/2020/12/13214207/FotoJet-75.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rishabh Pant : भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला. या अपघातात ऋषभ पंतला खूप दुखापत झाली आहे. ज्यामुळे तो बराच काळापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर असून पुढील वर्षभर देखील मैदानात परतण्याची शक्यता कमी आहे. त्यात आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची (IND vs AUS Test) बॉर्डर-गावस्कर मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे. दरम्यान या महत्त्वाच्या मालिकेत ऋषभ पंत टीम इंडियाचा भाग असणार नसल्यानं संघाला त्याची बरीच उणीव भासेल, अशी प्रतिक्रिया माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार इयान चॅपेल (ian chappell) याने व्यक्त केलं आहे.
काय म्हणाला चॅपेल?
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ऋषभ पंतच्या गैरहजेरीवर (Rishabh Pant) ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू इयान चॅपेलनं मोठं वक्तव्य केलं आहे. या मालिकेत भारतीय संघाला (Team India) ऋषभ पंतची उणीव मोठ्या प्रमाणात भासणार असल्याचं त्यानं म्हटलं आहे. ऋषभ पंत विरोधी संघांचा प्रमुख खेळाडू आहे, पण तो या मालिकेत टीम इंडियाचा भाग असणार नाही. यावर बोलताना ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार म्हणाला की, ऋषभ पंत न खेळणं हा टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. त्याचबरोबर ऋषभ पंतला न खेळवल्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला मिळेल, असंही त्यानं सांगितलं. इयान चॅपेलच्या मते, बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत भारतीय संघाला ऋषभ पंतची उणीव नक्कीच भासेल. ऋषभ पंतचा दृष्टिकोन काउंटर अॅटॅकचा आहे, पण तो या मालिकेत नसेल. याचा फायदा ऑस्ट्रेलियन संघाला नक्कीच मिळणार आहे. ऋषभ पंत अशा खेळाडूंपैकी एक आहे जो समोरच्या संघानं दिलेलं आव्हान वेगाने पूर्ण करु शकतो. त्यामुळे समोरच्या संघाच्या कर्णधाराची झोप तो उडवू शकतो, असंही चॅपेल म्हणाला.
ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक (2023)
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला कसोटी सामना | 9-13 फेब्रुवारी 2023 | नागपूर |
दुसरा कसोटी सामना | 17-21 फेब्रुवारी 2023 | दिल्ली |
तिसरा कसोटी सामना | 1-5 मार्च 2023 | धर्माशाला |
चौथा कसोटी सामना | 9-13 मार्च 2023 | अहमदाबाद |
पहिला एकदिवसीय सामना | 17 मार्च 2023 | मुंबई |
दुसरा एकदिवसीय सामना | 19 मार्च 2023 | विशाखापट्टम |
तिसरा एकदिवसीय सामना | 22 मार्च 2023 | चेन्नई |
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)