23 वर्षीय ऑस्ट्रेलिया खेळाडूचा मृत्यू; बॉर्डर गावसकर मालिका सुरु असताना धक्कादायक घटना
ॲडलेड कसोटीसाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियात शोककळा पसरली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना पर्थमध्ये खेळला गेला, जो टीम इंडियाने 295 धावांनी जिंकला. आता दुसरा कसोटी सामना ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे, या सामन्याला अजून बराच वेळ बाकी आहे. ॲडलेड कसोटीसाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. दरम्यान, या मालिकेदरम्यान संपूर्ण ऑस्ट्रेलियात शोककळा पसरली आहे. कारण एका युवा ऑस्ट्रेलियन क्रिकेटरचा मृत्यू झाला आहे.
स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरसारख्या दिग्गजांसोबत खेळलेल्या 23 वर्षांच्या क्रिकेटरचा मृत्यू झाला आहे. ॲडी डेव्हच्या मृत्यूनंतर संपूर्ण ऑस्ट्रेलियन क्रिकेट हादरला आहे. कारण या खेळाडूचा मृत्यू कसा झाला यांचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा मृत्यू
डार्विन क्रिकेट क्लबने सोशल मीडियावर पोस्ट करत ॲडी डेव्हच्या मृत्यूची माहिती दिली. तो एक अष्टपैलू खेळाडू होता आणि डाव्या हाताच्या फिरकीसाठी प्रसिद्ध होता. ॲडी डेव्ह हा वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्याने 2017 मध्ये डार्विनमध्ये डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथच्या संघादरम्यान एक सामना खेळला गेला. ज्यामध्ये त्याला क्षेत्ररक्षण करण्याची संधी मिळाली होती.
27 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे सर्व चाहते दुःखी आहेत, कारण या दिवशी फिल ह्यूजचे निधन झाले होते. प्रथम श्रेणी सामन्यादरम्यान त्याच्या डोक्याला चेंडू लागला आणि 27 नोव्हेंबर 2014 रोजी त्याचा मृत्यू झाला. बाऊन्सर असलेल्या शॉन ॲबॉटचा चेंडू सोडत असताना तो चेंडू फिल ह्युजेसच्या डोक्याच्या मागच्या बाजूला लागला, त्यानंतर तो कोमात गेला. अखेर रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या खेळाडूला ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळणार होते पण त्याआधीच हा अपघात झाला. आता या तारखेच्या एक दिवस आधी, आणखी एक ऑस्ट्रेलियन क्रिकेटर हे जग सोडून गेला.
हे ही वाचा -