VIDEO: LIVE मॅचवेळी प्रेक्षक गॅलरीत भलं मोठं होर्डिंग कोसळलं, विश्वचषक सामनादरम्यान भीषण दुर्घटना टळली
Storm Ekana Cricket Stadium : विश्वचषकातील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यादरम्यान भीषण दुर्घटना टळली आहे.
Storm Ekana Cricket Stadium : विश्वचषक सामन्यादरम्यान भीषण दुर्घटना टळली आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यावेळी प्रेक्षक गॅलरीत भलं मोठं होर्डिंग कोसळलं. पण त्यावेळी खुर्च्यावर कुणीही नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. इकाना स्टेडिअममधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
श्रीलंकेची फलंदाजी सुरु असताना लखनौमध्ये वादळी वाऱ्याने पावसाची हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे खेळाडूंसोबत चाहतेही हैराण झाले होते. त्याचवेळी स्टेडिअमला लावण्यात आलेले होर्डिंग कोसळले. त्यावेळी तिथे चाहते नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
Ekana stadium Lucknow
— Samyak Mordia (@SamyakMordia) October 16, 2023
Australia v. Sri Lanka pic.twitter.com/Z3ZasLsegx
स्टेडिअममध्ये बॅनर पडल्यानंतर चाहते थोड्यावेळासाठी घाबरले होते. त्याशिवाय गोंधळाची स्थितीही पाहायला मिळाली. त्यानंतर प्रेक्षकांना दुसरीकडे बसण्यास सांगण्यात आले. पाऊस आणि वादळामुळे सामन्याचा दुसरा डाव थोडा उशीरा सुरू झाला. श्रीलंकेच्या फलंदाजीदरम्यानही पावसाने हजेरी लावली होती. श्रीलंकेने चांगल्या सुरुवातीनंतर झटपट विकेट गमावल्या. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी श्रीलंकेचा डाव झटपट संपवला.
Due to strong winds, hoardings are falling all over Lucknow's Ekana Stadium.
— Ali Taabish Nomani (@atnomani) October 16, 2023
Spectators running for safety.#CWC23 #AUSvSL #WorldCup2023 #Lucknow @BCCI @ICC pls remove these banners before the next match. pic.twitter.com/xxoqK775jK
श्रीलंकेची फलंदाजी कोसळली -
वादळी सुरुवात करणाऱ्या श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाने अवघ्या 209 धावांत रोखले आहे. श्रीलंकेचे 9 फलंदाज फक्त 52 धावांत तंबूत परतले. त्यामुळे श्रीलंकेचा संपूर्ण डाव 43.3 षटकांत 209 धावांत संपूष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून एडम जम्पा याने 4 विकेट घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. विश्वचषकातील पहिल्या विजयासाठी ऑस्ट्रेलियापुढे 210 धावांचे आव्हान आहे. दुसरीकडे श्रीलंकेला पहिल्या विजयासाठी ऑस्ट्रेलियाला 209 धावां करण्यापासून रोखायचं आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौच्या इकाना स्टेडिअमवर निसंका आणि कुसर परेरा यांनी वादळी सुरुवात केली. स्टार्क, स्टार्क, हेजलवूड यासारख्या गोलंदाजांचा त्यांनी शानदार सामना केला. निसंका आणि परेरा यांनी श्रीलंकेसाठी शतकी सलामी दिली. श्रीलंकेचा संघ 300 धावांच्या पुढे जाणार असे वाटले होते. पण ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने श्रीलंकेच्या दोन्ही सलामी फलंदाजांना तंबूत धाडले. तिथूनच श्रीलंकेची वाताहत झाली.
निसंका आणि परेरा यांनी पहिल्या विकेटसाठी 21.4 षटकांमध्ये 125 धावांची सलामी दिली. निसंका याने 67 चेंडूमध्ये 61 धावांची दमदार खेळी केली. यामध्ये आठ चौकारांचा समावेश होता. निसंका तंबूत परतल्यानंतर कुसल परेराही फार काळ टिकू शकला नाही. 78 धावांवर परेरा बाद झाला. परेराने 82 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 78 धावांची खेळी केली. परेरा बाद झाल्यानंतर श्रीलंकेची फलंदाजी कोलमडली. एकापाठोपाठ एक तंबूत परतले. चिरिथ असलंका याने अखेरपर्यंत लढा दिला. त्याने 39 चेंडूमध्ये एका षटकाराच्या मदतीने 25 धावांचे योगदान दिले. त्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या ओलंडता आली नाही.
ये रे माझ्या मागल्या प्रमाणे श्रीलंकेने विकेट फेकल्या. कर्णधार कुसल मेंडल 9 धावांवर बाद झाला. सदिरा समरविक्रमा याला आठ धावा करता आल्या. धनंय डिसल्वा याला सात धावांचे योगदान देता आले. दुनिथा वेलालागे दोन धावांवर धावबाद झाला. चमिका करुनारत्ने दोन, महिश तिक्ष्णा शून्य, लहुरु कुमारा चार धावांवर बाद झाला.
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना सुरुवातीला विकेट मिळाली नाही. पण त्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक लंकेच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. मिचेल स्टार्कने 10 षटकात 43 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. पॅट कमिन्सने दोन फलंदाजांना तंबूत धाडले. ग्लेन मॅक्सवेल याला एक विकेट मिळाली. अॅडम झम्पा याने शानदार गोलंदाजी केली. झम्पाने 8 षटकात 47 धावा खर्च करत चार विकेट घेतल्या. मार्कस स्टॉयनिस आणि जोश हेजलवूड यांना एकही विकेट घेता आली नाही.