Ind vs Aus 2nd Test Day-1 : कांगारूंने टीम इंडियाला रडवलं! पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाचं वर्चस्व, पहिल्या दिवशी काय घडलं?
Australia vs India 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी सुरू झाली आहे.
Australia vs India 2nd Test Day-1 Stumps : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी सुरू झाली आहे. हा सामना ॲडलेडमध्ये खेळला जात आहे. पहिल्या दिवसाशी खराब फलंदाजीमुळे भारताला केवळ 180 धावा करता आल्या. एकाही फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 86 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने फक्त 1 विकेट गमावली आहे. मॅकस्विनी आणि लॅबुशेन खेळत आहेत.
दुसऱ्या कसोटीत रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीला आलेली यशस्वी जैस्वाल पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याच्यासोबत आलेल्या केएल राहुलने 37 धावा केल्या. हे दोन्ही फलंदाज स्टार्कच्या चेंडूवर बाद झाले. चौथ्या क्रमांकावर आलेला विराट कोहली 7 धावा करून बाद झाला. शुभमन गिलने 31, ऋषभ पंतने 21 धावा केल्या. रोहित शर्माने 3 धावा केल्या. याशिवाय नितीश रेड्डीने 42 धावांची खेळी केली. अशा प्रकारे भारताने पहिल्या डावात 180 धावा केल्या.
Nathan McSweeney and Marnus Labuschagne held fort for Australia, slashing almost half the deficit in the final session 👏 #WTC25 | 📝 #AUSvIND: https://t.co/fq7nnvPgWw pic.twitter.com/69vexV17Tx
— ICC (@ICC) December 6, 2024
मिचेल स्टार्कचा विकेटचा षटकार
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने भारताविरुद्धच्या पहिल्या डावात एकूण 6 विकेट घेतल्या. त्याने प्रथम यशस्वी जैस्वालला बाद केले. यानंतर त्याने केएल राहुल आणि विराट कोहलीची विकेट घेतली. नितीश रेड्डी, आर अश्विन आणि हर्षित राणा यांनाही मिचेल स्टार्कने बाद केले.
ऑस्ट्रेलिया 94 धावांनी मागे
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 86 धावा केल्या होत्या. या काळात त्याने 1 विकेट गमावली आहे. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन मॅकस्वीनी आणि मार्नस लॅबुशेन हे शानदार फलंदाजी करत आहेत. मॅकस्वीनीने नाबाद 38 धावा केल्या आहेत, तर लॅबुशेनने 20 धावा केल्या आहेत. भारताला आतापर्यंत फक्त एक विकेट मिळाली आहे. बुमराहने उस्मान ख्वाजाला बाद केले. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या दिवसाच्या खेळाला 86 धावांनी सुरुवात करेल.
𝐅𝐚𝐬𝐭 𝐚𝐧𝐝 𝐟𝐮𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐟𝐭. 𝐌𝐢𝐭𝐜𝐡𝐞𝐥𝐥 𝐒𝐭𝐚𝐫𝐜 🔥 #WTC25 | #AUSvIND pic.twitter.com/p57guenH6y
— ICC (@ICC) December 6, 2024
हे ही वाचा -