U19 World Cup 2026: अंडर-19 2026 च्या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; दोन भारतीयांसह पाच आशियाई वंशाच्या खेळाडूंची निवड, कोणाकोणाला संधी?
U19 World Cup 2026: आयसीसी 2026 चा पुरुषांचा अंडर-19 विश्वचषक15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान नामिबिया आणि झिम्बाब्वे येथे खेळवण्यात येणार आहे.

U19 World Cup 2026: आयसीसी 2026 चा पुरुषांचा अंडर-19 विश्वचषक (U19 World Cup 2026) 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान नामिबिया आणि झिम्बाब्वे येथे खेळवण्यात येणार आहे. यासाठी भारतीय वंशाचे दोन खेळाडू आर्यन शर्मा (Aryan Sharma) आणि जॉन जेम्स यांचा ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 विश्वचषकासाठी संघात समावेश करण्यात आला आहे. आर्यन शर्मा हा एक उपयुक्त फलंदाज आणि डावखुरा स्पिनर आहे, तर जॉन जेम्स हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. आर्यन शर्मा आणि जॉन जेम्स हे दोघंही सप्टेंबरमध्ये भारताविरुद्धच्या युवा कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत खेळलेल्या संघाचा भाग होते.
श्रीलंका आणि चीन वंशाच्या खेळाडूंचाही समावेश- (Australia U19 WC Squad)
भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूंव्यतिरिक्त, श्रीलंकेच्या वंशाचे दोन खेळाडू नदीन कुरे आणि नितेश सॅम्युअल यांचा ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या संघात चिनी वंशाचा खेळाडू (अॅलेक्स ली यंग) देखील आहे. ऑलिव्हर पीक ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 संघाचे नेतृत्व करेल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा गट अ मध्ये आयर्लंड, जपान आणि श्रीलंकेसह समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ जानेवारीच्या सुरुवातीला नामिबियात पोहोचेल आणि 9 ते 14 जानेवारी दरम्यान सराव सामने खेळेल.
मुख्य प्रशिक्षक टिम निल्सन काय म्हणाले? (Australia U19 WC Squad)
ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 विश्वचषक संघाचे मुख्य प्रशिक्षक टिम निल्सन म्हणाले, आयसीसी अंडर-19 विश्वचषकासाठी एक मजबूत आणि संतुलित संघ जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. आमचे लक्ष अशा खेळाडूंची निवड करण्यावर आहे, ज्यांचे कौशल्य एकमेकांना पूरक आहे आणि ज्यांच्याकडून आम्हाला स्पर्धेत यशाची अपेक्षा आहे. निवडलेल्या खेळाडूंनी सप्टेंबरमध्ये भारताविरुद्धच्या अंडर-19 मालिकेत आणि पर्थमध्ये अलीकडेच सुरू झालेल्या राष्ट्रीय अंडर-19 स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती.
ऑस्ट्रेलिया अंडर-19 पुरुष संघ: (Australia U19 WC Squad)
ऑलिव्हर पीक (कर्णधार), केसी बार्टन, नदीन कुरे, जेडेन ड्रेपर, बेन गॉर्डन, स्टीव्हन होगन, थॉमस होगन, जॉन जेम्स, चार्ल्स लॅचमंड, विल मलाजचुक, नितेश सॅम्युअल, हेडन शिलर, आर्यन शर्मा, विल्यम टेलर, अॅलेक्स ली यंग.





















