IND vs AUS : कांगारूंनी टाकल्या माना, अश्विन-जडेजाच्या फिरकीची जादू; ऑस्ट्रेलियेचा दुसरा डाव 113 धावांवर संपुष्टात
IND vs AUS : भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 113 धावांवर रोखला आहे. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोघांच्या फिरकीच्या जादूपुढं ऑस्ट्रेलियाचा संघ गारद झाला.
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात दिल्लीत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर (Delhi Test) भारतीय संघानं मजबूत पकड केलीय. भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 113 धावांवर रोखला आहे. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोघांच्या फिरकीच्या जादूपुढं ऑस्ट्रेलियाचा संघ गारद झाला. दरम्यान भारतीय संघाला विजयासाठी 115 धावांची गरज आहे.
दिल्ली कसोटीच्या तिसर्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 61/1 अशा धावसंख्येवरुन आज खेळायला सुरुवात केली. ट्रॅव्हिस हेड (39) आणि मार्नस लबुशेन (16) क्रीझवर होते. कालच्या 61 धावांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने चार धावांची भर घातलताच अश्विनने ट्रेव्हिड हेडची (43) विकेट घेतली. यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि लबुशेन यांनी 20 धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्मिथ (9) धावांवर बाद झाला.
एकूण 95 धावांवर 4 गडी बाद
ट्रेव्हिड हेड आणि स्मिथची विकेट गमावल्यानंतर लॅबुशेन आणि मॅट रॅनशॉ यांनी धावसंख्या 95 धावांवर नेली होती. तेव्हा लबुशेन (35) जडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर 95 या धावसंख्येवर आणखी तीन विकेट पडल्या. मॅट रॅनशॉ (2), पीटर हँड्सकॉम्ब (0) आणि कर्णधार पॅट कमिन्स (0) खेळपट्टीवर फार काळ टिकू शकले नाहीत. अश्विनने रॅनशॉला पॅव्हेलियनमध्ये तर जडेजाने पीटर आणि कमिन्सला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ऑस्ट्रेलियाचे 7 खेळाडू 95 धावांवर बाद झाले होते.
जडेजाने 7 आणि अश्विनला 3 विकेट
अॅलेक्स कॅरी आणि नॅथन लियॉन यांनी 15 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियन संघाला 95 धावांत 7 विकेट गमावल्यानंतर 100 पर्यंत नेले. अॅलेक्स कॅरीला (7) जडेजाने बाद केले. यानंतर नॅथन लिऑन (8) आणि मॅथ्यू कुहनेमनला (0) देखील जडेजाने बाद केले. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ केवळ 113 धावांवरच बाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाने 42 धावांत 7 बळी घेतले, तर अश्विनने 59 धावांत 3 बळी घेतले.
भारताचा पहिला डाव 262 धावांवर संपुष्टात आला होता
ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 263 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल भारताचा डाव 262 धावांवर संपुष्टात आला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने एक बाद 61 धावा केल्या आहेत. ट्रेविस हेड 39 तर मार्नस लाबुशेन 16 धांवावर खेळत आहे. उस्मान ख्वाजा जाडेजाच्या चेंडूवर बाद झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या: