एक्स्प्लोर

IND vs AUS : दिल्ली कसोटी रोमांचक स्थितीत, दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाकडे 62 धावांची आघाडी

IND vs AUS 2nd Test Day 2 Highlights : दिल्लीमध्ये सुरु असलेला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना रोमांचक स्थितीत पोहचला आहे.

IND vs AUS 2nd Test Day 2 Highlights : दिल्लीमध्ये सुरु असलेला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना रोमांचक स्थितीत पोहचला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने एक विकेट्सच्या मोबद्लयात 61 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला एका धावेची आघाडी मिळाली होती. दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाकडे 62 धावांची आघाडी झाली आहे. दुसरा दिवस भारताच्या अष्टपैलू खेळाडूंनी गाजवला. अक्षर पटेल, जाडेजा आणि आर. अश्विन यांच्या फलंदाजीमुळे भारताने सामन्यात पुनरागमन केलं. 

ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 263 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल भारताचा डाव 262 धावांवर संपुष्टात आला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने एक बाद 61 धावा केल्या आहेत.  ट्रेविस हेड 39 तर मार्नस लाबुशेन 16  धांवावर खेळत आहे. उस्मान ख्वाजा जाडेजाच्या चेंडूवर बाद झाला. 

दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली तेव्हा रोहित शर्मा आणि राहुल यांनी संयमी सुरुवात केली. जोडी जमली असे वाटत असतानाच लॉयन याने राहुल याला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या पुजारालाही लॉयन याने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर लागोपाठ बाद झाले. त्यामुळे भारताचा डाव कोसळला असे वाटत होते. पण त्यावेळीच विराट कोहलीनं जाडेजाच्या साथीनं डाव सावरला. जाडेजा आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकी भागिदारी झाली. पण त्याचवेळी जाडेजाला 26 धावांवर बाद केलं. त्यानंतर विराट कोहलीही 44 धावांवर बाद झाला.. विराट कोहलीची विकेट पडल्यानंतर केएस भरत यालाही फारसी कमाल करता आली नाही. भारताचा डाव लवकर संपणार असे वाटत होते. पण अक्षर पटेल आणि आर अश्विन यांनी डावाची सुत्रे हातात घेतली. त्यांनी 117 चेंडूत 114 धावांची भागिदारी केली. आठव्या विकेटसाठी झालेल्या भागिदारीत ही सर्वोत्तम भागिदारी असल्याचं  म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अश्विन बाद झाल्यानंतर भारताचा डाव कोसळला.. अक्षर आणि शमीही लगेच तंबूत परतले. भारताचा पहिला डाव 262 धावांवर संपुष्टात आला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला फक्त एका धावेची आघाडी मिळाली. 

ऑस्ट्रेलियाने दिल्ली कसोटीत तीन फिरकी गोलंदाजांना मैदानात उतरले. त्यांनी आपलं कामही चोख बजावले. नॅथन लॉयन याने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. त्याशिवाय पदार्पण करणाऱ्या मॅथ्यू कुन्हेमन  आणि मर्फी यांना प्रत्येकी दोन दोन विकेट मिळाल्या. कर्णधार पॅट कमिन्सला एका विकेटवर समाधान मानावं लागले. 

भारताकडून एकमेव अर्धशतक
अक्षर पटेल यानं मोक्याच्या क्षणी 74 धावांची खेळी केली. भारताकडून हे एकमेव अर्धशतक होय. विराट कोहलीनं 44, अश्विन याने 37, जाडेजानं 26 आणि कर्णधार रोहित शर्माने 32 धावांची खेळी केली. यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून हतकडी सोडली अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून हतकडी सोडली अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरस्वास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरस्वास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP MajhaMarathi Bhasha Abhijat Darja : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णयAjit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial ReportMahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून हतकडी सोडली अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून हतकडी सोडली अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरस्वास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरस्वास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Sunil Tatkare : आम्ही निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर घेतलं, दुर्दैवाने ते आज माझ्या सोबत नाहीत; पुण्यातील घटनेनं सुनिल तटकरे हळहळले
आम्ही निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर घेतलं, दुर्दैवाने ते आज माझ्या सोबत नाहीत; पुण्यातील घटनेनं सुनिल तटकरे हळहळले
ZP शाळेतील शिक्षकाविरुद्द तक्रार, पोक्सोअंतर्गत गुन्हा; शिक्षणाधिकाऱ्यानं केलं निलंबित
ZP शाळेतील शिक्षकाविरुद्द तक्रार, पोक्सोअंतर्गत गुन्हा; शिक्षणाधिकाऱ्यानं केलं निलंबित
Embed widget