(Source: ECI/ABP News/ABP Majha)
AUS vs SA : बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाचे खेळाडू दुखापतग्रस्त, ग्रीन, वॉर्नरसह स्टार्कही Injured
AUS vs SA 2nd Test: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यात मेलबर्नच्या मैदानात बॉक्सिंग डे टेस्ट सुरु असून ऑस्ट्रेलियन संघ दमदार फॉर्मात दिसत आहे.
AUS vs SA 2nd test : मेलबर्नच्या क्रिकेट ग्राऊंडमध्ये सुरु ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यातील यांच्यातील दुसरा कसोटी सामना ज्याला बॉक्सिंग डे कसोटीही म्हटलं जात आहे, त्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या दुखापतींचं सत्र सुरुच आहे. सामन्याच्या पहिल्या दोन डावातच ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. सामन्यात आतापर्यंत ऑस्ट्रेलियन संघ चांगल्या फॉर्मात दिसला आहे. यामध्ये सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने (David Warner) शानदार द्विशतक झळकावलं. मात्र, द्वीशतक झळकावल्यानंतर वॉर्नरला क्रॅम्प आला आणि तो दुखापतग्रस्त म्हणून रिटायर होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. सामन्यात वॉर्नरशिवाय अष्टपैलू कॅमेरून ग्रीन आणि वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांनाही गंभीर दुखापत झाली. यामध्ये मिचेल स्टार्कला सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी सुरु असताना दुखापत झाली तर कॅमरुनच्या बोटाला दक्षिण आफ्रिकेच्या नॉर्खियाचा वेगवान चेंडूने जखमी केलं.
कॅमरुनच्या बोटाला दुखापत
फलंदाजी करताना कॅमेरून ग्रीनला दुखापत झाली. त्याच्या बोटाला दुखापत झाली आणि बोटातून रक्त देखील येऊ लागलं. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नोर्खियाने ग्रीनला टाकलेल्या बाउन्सरमुळे कॅमेरुन दुखापतग्रस्त झाला. नोर्खियाचा चेंडू सरळ जाऊन ग्रीनच्या बोटाला लागला. त्याची दुखापत इतकी गंभीर होती की त्याला दुखापतीमुळे रिटायर होऊन पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
वॉर्नरला क्रॅम्पचा त्रास
100व्या कसोटी सामन्यात द्विशतक पूर्ण केल्यानंतर वॉर्नरला क्रॅम्पचा त्रास सुरु झाला. द्विशतक झळकावल्यानंतर त्याने सेलिब्रेशन केले आणि त्याला अचानक क्रॅम्प आला. यानंतर वॉर्नरला फलंदाजी करता आली नाही आणि त्यालाही पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. वॉर्नर आपल्या 100व्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावणारा पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला.
स्टार्कच्याही बोटाला जखम
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला दुखापत झाली आहे. दुखापत झाल्यानंतर त्याने मैदान सोडले. तो पुढील डावात गोलंदाजी करेल की नाही याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. मिचेल स्टार्क आणि कॅमेरून ग्रीन यांच्याशिवाय संघाकडे गोलंदाजीसाठी फक्त दोन वेगवान गोलंदाज शिल्लक आहेत. यामध्ये स्कॉट बोलँड आणि कॅप्टन पॅट कमिन्स यांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत
या सामन्याला दोन दिवस पूर्ण झाले. दुसऱ्या दिवसापर्यंत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 3 विकेट गमावून 386 धावा केल्या आहेत. या धावांमुळे ऑस्ट्रेलियाने 197 धावांची आघाडी मिळवली आहे. पहिल्या डावात आफ्रिकेचे गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. नॉर्खिया आणि मार्को जॅनसेन व्यतिरिक्त इतर गोलंदाजांची इकोनॉमी 4 हून अधिक असल्याचं दिसून आलं आहे.
हे देखील वाचा-