(Source: ECI/ABP News/ABP Majha)
AUS vs SA: वेगानं आलेला स्पायडर कॅमेरा थेट नार्खियाला धडकला, पुढं काय घडलं? तुम्हीच पाहा
AUS vs SA 2nd Test: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यातील मेलबर्न (Melbourn Cricket Ground) कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला आहे.
AUS vs SA 2nd Test: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यातील मेलबर्न (Melbourn Cricket Ground) कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत स्थितीत दिसत आहे. ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत तीन विकेट्सच्या मोबदल्यात 386 धावा केल्या आहेत. तर, याच सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मैदानात अशी काही विचित्र घटना घडली, जे पाहून खेळाडू, पंच आणि प्रेक्षकही आश्चर्यचकीत झाले. दुसऱ्या दिवशीच्या खेळदरम्यान वेगानं आलेला स्पायडर कॅमेरा थेट दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नार्खियाला (Anrich Nortje) धडकला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एनरिक नॉर्खिया बॅकवर्ड स्केअरमध्ये फिल्डिंग करताना दिसत आहे. त्याचवेळी मैदानातील स्पायडर कॅमेरा जोरात नॉर्खियाला धडकला. ज्यामुळं नॉर्खिया जमीनीवर कोसळला. मात्र तो लगेच उभा राहतो, हे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. विशेष म्हणजे, नॉर्खिया कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही, ही संघासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
व्हिडिओ-
Who said cricket isn’t a contact sport?
— The Sage (@SarkySage) December 27, 2022
South African player Anrich Nortje hit by the aerial camera at the #BoxingDayTest
Meanwhile Warner has his century & Australia only two wickets down and 2 runs away from SA’s first innings total (Warner on 115 & Smith on 39) pic.twitter.com/ZafPYIJPue
वॉर्नरची दमदार द्विशतकी खेळी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मेलबर्न कसोटीत वॉर्नरनं अप्रतिम खेळी करताना द्विशतक झळकावलं. हे द्विशतक त्याच्यासाठी खूप खास होतं. कारण ते त्याच्या कारकिर्दीतील 100व्या कसोटीत आलं . वॉर्नर आपल्या 100व्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावणारा पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे. याशिवाय वॉर्नरनं त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 8000 धावाही पूर्ण केल्या आहेत. वॉर्नरचं हे शतक 3 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर आलंय. वॉर्नरचं फॉर्ममध्ये येणं ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ:
डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
दक्षिण आफ्रिकेचा संघ:
डीन एल्गर (कर्णधार), सरेल एरवी, थ्युनिस डी ब्रुइन, टेम्बा बावुमा, खाया झोंडो, काइल वेरेने (विकेटकिपर), मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, अॅनरिक नॉर्खिया, लुंगी एनगिडी.
हे देखील वाचा-