एक्स्प्लोर

बाबर आझम अन् शाहीन भिडले, आशिया चषकातून आव्हान संपल्यानंतर ड्रेसिंग रुमध्ये बाचाबाची

Asia Cup 2023, Pakistan Team : रविवारी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअममध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आशिया चषकाची फायनल होणार आहे.

Asia Cup 2023, Pakistan Team : रविवारी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअममध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आशिया चषकाची फायनल होणार आहे. गतविजेत्या श्रीलंका संघाने पाकिस्तानचा पराभव करत दिमाखात आशिया चषकाच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. पाकिस्तान संघाचे गुरुवारी आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आलेय. आशिया चषकातून गाशा गुंडाळल्यानंतर पाकिस्तान संघामधील अंतर्गत कलह समोर आला आहे. पाकिस्तान संघातील दोन स्टार खेळाडू भिडल्याचे वृत्त समोर आलेय. मिळालेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांच्यामध्ये ड्रेसिंग रुमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी मोहम्मद रिझवान याने मध्यस्थी केली. 

‘बोल न्यूज’ ने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार,  श्रीलंकाविरोधातील पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने खेळाडूंना ड्रेसिंग रुममध्ये बोलवले.  बाबर खेळाडूंशी त्यांच्या खराब कामगिरीबद्दल बोलत होता, मात्र वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने त्याला अडवले. तो म्हणाला की, किमान ज्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली त्यांचे कौतुक करायला हवे, असे म्हटले. बाबरला शाहीनची ही गोष्ट अजिबात आवडली नाही. पाकिस्तानी कर्णधाराने सांगितले की, त्याला माहित आहे की कोणाची कामगिरी चांगली आहे. शाहीन आणि बाबर यांच्यातील वाद खूप वाढला. अखेर त्यांचा वाद सोडवण्यासाठी संघाचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानला यावे लागले. बाबरने ड्रेसिंग रूममधील खेळाडूंना सांगितले होते की ते जबाबदारीने खेळत नाहीत. यावर शाहीन आफ्रिदीने थांबवले होते. 

सुपर ४ मध्ये पाकिस्तानची खराब कामगिरी - 

आशिया चषकाच्या साखळी फेरीत पाकिस्तान संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले होते.  पण सुपर ४ स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी अतिशय खराब झाली. सुपर ४ फेरीत पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत तळाला राहिला. बांगलादेशचा संघही त्यांच्यापेक्षा वरती आहे. 

पाकिस्तान संघाला सुपर-4 मध्ये बांगलादेशविरुद्ध पहिला सामना जिंकला आणि त्यानंतर सलग दोन्ही सामने गमावले. भारताविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा २२८ धावांनी पराभव झाला. यानंतर संघाला डीएलएस पद्धतीने श्रीलंकेविरुद्ध २ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. भारताविरोधात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे नेटरनरेट मोठ्या प्रमाणात घसरला. त्यामुळे पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत तळाला राहिला.  

 

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Dravid News : विराट कोहलीला नाकारलं, बेस्ट कॅप्टन म्हणून पाकिस्तानच्या खेळाडूला निवडलं; राहुल द्रविडच्या निर्णयाने सगळेच चक्रावले
विराट कोहलीला नाकारलं, बेस्ट कॅप्टन म्हणून पाकिस्तानच्या खेळाडूला निवडलं; राहुल द्रविडच्या निर्णयाने सगळेच चक्रावले
IND vs AFG LIVE Streaming : ना JioHotstar, ना Sony LIV...; मग भारत-अफगाणिस्तान पहिली टी-20 मॅच नक्की LIVE कुठे पाहायची? जाणून घ्या A टू Z
ना JioHotstar, ना Sony LIV...; मग भारत-अफगाणिस्तान पहिली टी-20 मॅच नक्की LIVE कुठे पाहायची? जाणून घ्या A टू Z
S Sreesanth Father Dies : क्रिकेटपटू श्रीसंतचा खंदा आधार हरपला, वडिलांचे निधन, 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
क्रिकेटपटू श्रीसंतचा खंदा आधार हरपला, वडिलांचे निधन, 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Ind vs Afg 1st T20 Playing XI : इशान किशन OUT, तर संजू सॅमसन IN... शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट, अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
इशान किशन OUT, तर संजू सॅमसन IN... शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट, अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...कॅनडाबाबत म्हणाले...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Embed widget