एक्स्प्लोर

बाबर आझमची आशिया चषकात वादळी सुरुवात, पहिल्याच सामन्यात शतकी तडाखा

Babar Azam Century : मुल्तानमध्ये आशिया चषकाला दिमाखात सुरुवात झाली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Babar Azam Century : मुल्तानमध्ये आशिया चषकाला दिमाखात सुरुवात झाली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नवख्या नेपाळपुढे पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. दोन्ही सलामी फलंदाज स्वस्तात परतले, पण बाबर आझम याने पाकिस्तानचा डाव सांभळला. आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात बाबर आझम याने वादळी सुरुवात केली. बाबर आझम याने शतकी खेळी करत पाकिस्तानची धावसंख्या वाढवली. 

पहिल्याच सामन्यात बाबर आझम याने शतक ठोकले. नेपाळविरुद्ध शतक ठोकत आपण फॉर्ममध्ये परतल्याचे बाबरने दाखवून दिले. बाबरने वनडे करिअरमधील 19 वे शतक ठोकले. बाबर आझम याच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाने आशिया चषक 2023च्या पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने अवघ्या 25 धावांवर दोन महत्वपूर्ण विकेट्स गमावल्या. मात्र, त्यानंतर बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि शतक ठोकले. बाबरने 109 चेंडूत वादळी शतक पूर्ण केले. बाबरच्या शतकी खेळीच्या बळावर पाकिस्तानने सन्मानजनक धावसंख्या उभारली.

बाबर आझम याने संयमी सुरुवात करत पाकिस्तानचा डाव सावरला. त्यानंतर विस्फोटक फलंदाजी करत धावसंख्या वाढवली. इफ्तिखारसोबत बाबर आझम याने दीडशे धावांची भागिदारी केली. त्याशिवाय मोहम्मद रिझवान याच्यासोबत 86 धावांची भागिदारी केली.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकली - 

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला. आशिया चषक सुरु होण्याच्या पूर्वसंध्येलाच पाकिस्तान संघाने प्लेईंग 11 ची घोषणा केली होती. पाहा दोन्ही संघात कोण कोणते खेळाडू ?

पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन -

फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रऊफ

नेपाळच्या संघात कोणते शिलेदार : 

कुशल भुर्टेल, आसिफ शेख (विकेटकीपर), रोहित पौडेल (कर्णधार), आरिफ शेख, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंह ऐरी, गुलसन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंशी

नेपाळचे आशिया चषकात पदार्पण - 

नेपाळने आशिया चषकात आज पदार्पण केले. आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये नेपाळ संगाने दमदार कामगिरी केली आहे. पण पाकिस्तानविरोधात विजय मिळवणं नेपाळसाठी सोपं नसेल. पण नेपाळकडे गोलंदाजी दमदार आहे. संदीप लामिछाने हा अनुभव गोलंदाज आहे, तो एक्स फॅक्टर ठरु शकतो. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6.30 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra News : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : 08 March 2025 : ABP MajhaSpecial Report on Mahesh Motewar : महेश मोतेवारच्या 4 हजार 700 कोटी मालमत्तेचं काय झालं?Laxman Hake PC : फडणवीस ते जरांगे, कुणालाच सोडलं नाही; लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
Embed widget