IND Vs SL : रोहित शर्माने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी, लॉर्ड शार्दूलला आराम
Asia Cup 2023, IND Vs SL : भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Asia Cup 2023, IND Vs SL : भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंका संघ प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात ज्या मैदानावर सामना झाला त्याच मैदानावर श्रीलंकाविरोधात सामना होत आहे. टीम इंडिया तीन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरणार आहे.शार्दूल ठाकूर याला आराम देण्यात आला आहे.
टीम इंडिया तीन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरणार आहे. कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजा यांच्या जोडीला अक्षर पटेल याला स्थान देण्यात आले आहे. शार्दूल ठाकूर याला आजच्या सामन्यात आराम देण्यात आला आहे. भारतीय संघात इतर कोणताही बदल करण्यात आला नाही. दुसरीकडे श्रीलंका संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. मागील सामन्यातील विजयी संघ कायम ठेवण्यात आलाय.
🚨 Team News 🚨
— BCCI (@BCCI) September 12, 2023
1⃣ change for #TeamIndia as Axar Patel is named in the team in place of Shardul Thakur.
A look at our Playing XI 🔽
Follow the match ▶️ https://t.co/P0ylBAiETu #AsiaCup2023 | #INDvSL pic.twitter.com/gLNXpW0rjN
भारत आणि श्रीलंका संघ आशिया चषकात पहिल्यांदाच आमनेसामने असतील. सुपर 4 लढतीत भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. तर श्रीलंका संघाने बांगलादेशला मात दिली होती. दोन्ही संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळे सामना रंगतदार होणार आहे. श्रीलंका संघाने लागोपाठ 13 वनडे सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. श्रीलंकेचा विजयरथ रोखण्याचे आव्हान रोहित आणि टीमसमोर असेल.
खेळपट्टी कशी आहे ?
तीन दिवसांपासून कोलंबोमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे खेळपट्टी आणि मैदानावर परिणाम झालेला असू शकतो. आजही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रेमदासा स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांना पोषक आहे. मैदानाची आऊटफिल्डही वेगवान आहे. त्यामुळे पावसाने उसंत घेतली तर धावांचा पाऊस पडेल.
श्रीलंकाविरोधात टीम इंडियाचे 11 शिलेदार -
रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
श्रीलंकेच्या संघात कोण कोण ?
P Nissanka, D Karunaratne, K Mendis(w), S Samarawickrama, C Asalanka, D de Silva, D Shanaka(c), D Wellalage, M Theekshana, K Rajitha, M Pathirana
Asia Cup 2023. Sri Lanka XI: P Nissanka, D Karunaratne, K Mendis(w), S Samarawickrama, C Asalanka, D de Silva, D Shanaka(c), D Wellalage, M Theekshana, K Rajitha, M Pathirana https://t.co/P0ylBAiETu #INDvSL
— BCCI (@BCCI) September 12, 2023