IND Vs BAN Live Streaming: आज आशिया चषकमध्ये टीम इंडिया अन् बांगलादेशमध्ये लढत; फ्रीमध्ये कुठे पाहाल सामना?
IND Vs BAN: : टीम इंडिया (Team India) आणि बांगलादेश यांच्यातील सामना दुपारी 3 वाजता सुरू होईल. पण आजच्या सामन्याचाही पावसामुळे बेरंग होण्याची शक्यता आहे.
![IND Vs BAN Live Streaming: आज आशिया चषकमध्ये टीम इंडिया अन् बांगलादेशमध्ये लढत; फ्रीमध्ये कुठे पाहाल सामना? asia cup 2023 ind vs BAN live streaming and telecast when where and how to watch india vs sri lanka match live IND Vs BAN Live Streaming: आज आशिया चषकमध्ये टीम इंडिया अन् बांगलादेशमध्ये लढत; फ्रीमध्ये कुठे पाहाल सामना?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/1b4b701d8635f7855310543603c92aa7169476434578588_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND Vs BAN Live Streaming and Telecast Details: आशिया कप 2023 (Asia Cup 2023) च्या सुपर-4 चा शेवटचा सामना आज टीम इंडिया (Team India) आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांमधील सामना कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. स्पर्धेची सध्याची समिकरणं पाहिली तर आजच्या सामन्याचा निकाल काहीही लागला तरीदेखील त्याचा काहीच परिणाम होणार नाही. कारण, बांगलादेशचा संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे, तर टीम इंडियानं आधीच फायनलचं तिकीट मिळवलं आहे.
अशा परिस्थितीत या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बरेच बदल पाहायला मिळू शकतात. सतत खेळणाऱ्या अनेक स्टार खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. दोन्ही संघांबद्दल बोलायचं झालं तर टीम इंडियानं या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. तर बांगलादेशला फक्त एकच सामना जिंकता आला आहे. अशा परिस्थितीत, या दोघांमध्ये खेळला जाणारा सामना कधी, कुठे आणि कसा? तुम्हाला मोफत लाईव्ह पाहता येईल, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात...
कधी आणि कुठे होणार सामना?
टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात खेळवण्यात येणारा सामना कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. 15 डिसेंबर रोजी शुक्रवारी खेळवण्यात येणारा सामना भारतीय वेळेनुसार, दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. तर त्यापूर्वी अडीच वाजता टॉस उडवला जाईल.
टेलिव्हिजनवर फ्रीमध्ये कसा पाहाल सामना?
टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे भारतात टीव्हीवर थेट प्रक्षेपण केलं जाईल. याशिवाय, सामन्याचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्सद्वारे देखील केलं जाईल, जिथे प्रेक्षक विनामूल्य सर्व सामने लाईव्ह पाहू शकतील.
मोबाईलवर मोफत लाईव्ह सामने कसे पाहाल?
टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात खेळला जाणारा सामना डिस्ने प्लस हॉटस्टारवर विनामूल्य थेट प्रक्षेपित केला जाईल. दरम्यान, मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग फक्त मोबाईल युजर्ससाठी उपलब्ध असेल.
आशिया कपसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शामी, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा
आशिया कपसाठी बांगलादेशचा संघ
शाकिब अल हसन (कर्णधार), मोहम्मद नईम, मेहदी हसन मिराज, लिटन दास (विकेटकीपर), तौहीद हृदॉय, शमीम हुसैन, नसुम अहमद, तस्कीन अहमद, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, मेहदी हसन, अनामुल हक, अफीफ हुसैन, तंजीद हसन, तंजीम हसन साकिब
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)