एक्स्प्लोर

भारत आणि श्रीलंकामध्ये फायनलचा थरार, रविवारी कोलंबोतील पाऊस पडणार का? पाहा हवामानाचा अंदाज

Asia Cup Final, Weather Forecast : श्रीलंका संघाने गुरुवारी पाकिस्तानचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे.

Asia Cup Final, Weather Forecast : श्रीलंका संघाने गुरुवारी पाकिस्तानचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. दासुन शनाका याच्या संघाने स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी केली. आता रविवारी भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये आशिया चषकाची फायनल रंगणार आहे. श्रीलंका संघ आशिया चषकाचा गतविजेता आहे, त्यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे. पण रविवारी कोलंबोत होणाऱ्या सामन्यात पावसाची शक्यता आहे का? आशिय चषकातील काही सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे प्रभावित झालेत. भारतीय संघाच्या प्रत्येक सामन्यावेळी पावसान हजेरी लावली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता फायनलच्या थरारावेळी पावसाची शक्यता आहे. याबाबत जाऊन घेऊयात.... 

कोलंबोत रविवारी पाऊस कोसळणार का?

भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये रविवारी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडअमवर फायनल रंगणार आहे. तब्बल सतरा सामन्यानंतर आशिया चषकाचा किंग कोण यावरुन पडदा उठणार आहे. पण या फायनलवर पावसाचे सावट आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील लढतीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोलंबोमध्ये रविवारी ढगाळ वातावरण असेल. संपूर्ण दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. रविवारी कोलंबोच्या काही भागात पावसाची शक्यता आह. दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.  भारत आणि श्रीलंका यांच्यातील फायनल सामन्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. दरम्यान, आशिया चषकाच्या फायनल सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलाय. 

भारतीय संघासोबत श्रीलंकेचं आव्हान -   

सुपर ४ फेरीत श्रीलंकेचा पराभव करत भारतीय संघाने फायनलमध्ये धडक मारली होती. या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न श्रीलंका संघ करणार, यात शंकाच आहे. फायनलची लढत रंगतदार होईल. भारत आणि बांगलादेश संघाचे प्रत्येकी चार चार गुण आहेत. बांगलादेश आणि भारत यांच्यामध्ये सध्या अखेरचा सुपर चार सामना सुरु आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. फायनलमद्ये भारतीय संघासोबत श्रीलंका संघाचे आव्हान असेल.  

श्रीलंकेची स्पर्धेतील कामगिरी कशी राहिली ?
श्रीलंका संघाने स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. गतविजेत्या श्रीलंका संघाने पुन्हा एकदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. श्रलंका संघाने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पाच विकेटने पराभव केला होता. त्यानंतर आफगाणिस्तानला दोन धावांनी हरवले होते. पण सुपर ४ मध्ये श्रीलंका संघाला भारताविरोधात पराभवाचा सामना करावा लागला होता.  भारताने श्रीलंकेचा पराभव केला होता. श्रीलंकाला संघाला फायनलमध्ये भारताचा पराभव करणं कठीण जाणार आहे. श्रीलंकेचा संघ घरच्या मैदानावर खेळत असला तरी भारतीय संघ तुफान फॉर्मात आहे. सुपर ४ सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताला २१३ धावांत रोखले होते. पण फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली होती. श्रीलंकेचा संपूर्ण डाव १७२ धावांवर संपुष्टात आला होता.

टीम इंडिया अजिंक्य -
टीम इंडियाने आशिया चषकात आतापर्यंत अजेय आहे, एकाही सामना गमावला नाही.  पहिला सामना रद्द झाला. यानंतर नेपाळविरुद्ध १० गडी राखून विजय मिळवला. भारताने पाकिस्तानला 238 धावांनी हरवले. यानंतर श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव झाला. टीम इंडियाचा पुढील सामना आता बांगलादेशशी होणार आहे. तर अंतिम फेरीत श्रीलंकेशी दोन हात करणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget