"भारतीय क्रिकेटपटूंना गर्व चढलाय"; वेस्ट इंडीजच्या दिग्गज माजी खेळाडूचं वक्तव्य, नक्की काय म्हणाले अँडी रॉबर्ट्स...
IND vs WI : टीम इंडियाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यापूर्वी वेस्ट इंडीजचे दिग्गज माजी क्रिकेटपटू अँडी रॉबर्ट्स यांनी भारतीय खेळाडूंबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
Andy Roberts on Team India : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) पुढील महिन्यात वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया (Team India) यावेळी दोन टेस्ट, तीन वनडे आणि पाच टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. दरम्यान, भारतीय संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यापूर्वी वेस्ट इंडिजच्या माजी दिग्गज किक्रेटपटूनं मोठं वक्तव्य केलं आहे. वेस्ट इंडीजच्या दिग्गज माजी किक्रेटपटू अंडी रॉबर्टस् यांनी म्हटलं आहे की, भारतीय क्रिकेटपटूंना अहंकार चढला आहे.
अँडी रॉबर्ट्स यांचा टीम इंडियावर निशाणा
जागतिक कसोटी विश्वचषकाच्या सामन्या ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाल्यानंतर अँडी रॉबर्ट्स यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंवर निशाणा साधला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील टीम इंडियाच्या पराभनानंतर अँडी रॉबर्ट्स यांनी भारतीय पुरुष संघावर टीका केली आहे.
"भारतीय क्रिकेटपटूंना गर्व चढलाय"
वेस्ट इंडीजच्या दिग्गज माजी किक्रेटपटू अंडी रॉबर्टस् यांनी म्हटलं आहे की, ''भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना अहंकार चढला आहे. यामुळे ते जगातील इतर संघांना कमी लेखत आहेत. भारतीय संघाला त्यांचं लक्ष केंद्रीत करावं लागेल. टेस्ट क्रिकेट की टी-20 क्रिकेट यामधील नेमकं एक ठरवावं लागेल. टी20 क्रिकेट सुरुच राहिल. त्यासाठी स्पर्धा नाही.''
"भारताकडे काही चांगले खेळाडू आहेत, पण..."
अँडी रॉबर्ट्स यांनी 1970 आणि 1980 च्या दशकातील वेस्ट इंडिजच्या धडक गोलंदाज आहेत. अँडी रॉबर्ट्स यांनी म्हटलं आहे की, "भारताकडे काही चांगले खेळाडू आहेत, पण त्यांनी देशाबाहेर चांगली कामगिरी केलेली नाही. मला अपेक्षा होती की भारताने त्यांचे फलंदाजीतील पराक्रम दाखवावे. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीच्या अंतिम फेरीत मला कोणतेही चमकदार स्पॉट्स दिसले नाहीत. अजिंक्य रहाणेने कठोर संघर्ष केला असला तरी त्याच्या हाताला दुखापत झाली. शुभमन गिल जेव्हा ते शॉट्स खेळतो तेव्हा तो चांगला खेळतो. पण तो लेग स्टंपवर उभा राहतो आणि अनेकदा चेंडू स्टम्पवर टाकला जातो किंवा विकेटच्या मागे त्याचा झेल घेतला जातो."
''अश्विनला वगळण हास्यास्पद''
रॉबर्ट्स यांनी पुढे सांगितलं, "त्याचे (विराट कोहली) शॉट्स चांगले आहेत, पण त्याने चेंडूच्या मागे जायला हवं. भारताकडे काही चांगले खेळाडू आहेत, पण ते विश्वसनीय नाहीत. दौऱ्यावर त्यांनी चांगली कामगिरी केलेली नाही." भारताचा टॉप ऑर्डरचा कसोटी गोलंदाज आणि अव्वल ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला वगळल्याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. "अश्विनला वगळणं हास्यास्पद होतं. तुम्ही तुमचा सर्वोत्तम स्पिनर कसा निवडू शकत नाही?", असं रॉबर्ट्स यांनी म्हटलं आहे.