एक्स्प्लोर

Arjun Tendulkar Engaged with Sania Chandok: अर्जुन तेंडुलकरने बालपणीच्या मैत्रिणीसोबत केला गुपचूप साखरपुडा; कोण आहे सानिया चांडोक?

Arjun Tendulkar Engaged with Sania Chandok: अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा सानिया चांडोक हिच्यासोबत झाला आहे. हा साखरपुडा पूर्णपणे खाजगी पद्धतीने, फक्त कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत झाला.

Arjun Tendulkar Engaged with Sania Chandok: भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा मुलगा, क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar Engagement) याचा साखरपुडा सानिया चांडोक (Sania Chandok) हिच्यासोबत झाला आहे. सानिया या मुंबईतील नामांकित उद्योगपती रवी घई यांची नात असून, लवकरच तेंडुलकर घराण्याची सून होणार आहे. हा साखरपुडा पूर्णपणे खाजगी पद्धतीने, फक्त कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडल्याची माहिती इंडिया टूडेच्या वृत्ताने दिली आहे. 

कोण आहे सानिया चांडोक? (Who Is Sania Chandok)

25 वर्षीय अर्जुनचा साखरपुडा सानिया चांडोकशी झाला आहे. सानिया ही प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. अर्जुनची साखरपुडा अतिशय गुपचूप पार पडला. सानिया अर्जुनची बालपणीची मैत्रीण आहे. सानियाचे वडील रवी घई हे देखील सचिन तेंडुलकरचे मित्र आहेत.साखरपुडा समारंभ फारसा थाटामाटात आयोजित करण्यात आला नव्हता. दोन्ही कुटुंबातील जवळचे सदस्य आणि काही मित्रच या कार्यक्रमाला उपस्थित होते. सानियाचे कुटुंब मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपतींचे कुटुंब आहे. घई इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी (कमी कॅलरीज असलेले आइस्क्रीम ब्रँड) चे मालक आहेत. भारत सरकारच्या कॉर्पोरेट अफेअर्सच्या माहितीनुसार सानिया चांडोक ही डेसिगन्टेड पार्टनर आणि संचालक म्हणून Mr.Paws Pet Spa and Store LLP कार्यरत आहे. 

आयपीएलमधून मुंबई इंडियन्सच्या संघातून खेळतो अर्जुन तेंडुलकर-

अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकरने 2023 रोजी आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. अर्जुन तेंडुलकरने आतापर्यंत मुंबई इंडियन्ससाठी एकूण पाच सामने खेळले आहेत. यादरम्यान, त्याने 13 धावा केल्या आहेत आणि तीन विकेट घेतल्या आहेत. तथापि, अर्जुनला आयपीएलमध्ये फक्त एकाच सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली, ज्यामध्ये त्याने एका षटकाराच्या मदतीने 9 चेंडूत 13 धावा केल्या. अर्जुनने 2023 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. दरम्यान, अर्जुन तेंडुलकरला आयपीएल 2025 मध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

अर्जुन तेंडुलकरची क्रिकेट कारकीर्द-

अर्जुन नवीन चेंडूने चांगली गोलंदाजी करतो आणि खालच्या फळीतही फलंदाजी करू शकतो. अर्जुन तेंडुलकरने आतापर्यंत 17 प्रथम श्रेणी सामने, 18 लिस्ट ए सामने आणि 24 टी-20 सामने खेळले आहेत. डावखुरा मध्यमगती गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 532 धावा केल्या आहेत आणि 37 विकेट्स घेतल्या आहेत. अर्जुनने लिस्ट ए मध्ये 102 धावा आणि 25 विकेट घेतल्या आहेत. त्याचवेळी, टी-20 मध्ये  अर्जुन तेंडुलकरने 119 धावा केल्या आहेत आणि 27 विकेट्स घेतल्या आहेत.

संबंधित बातमी:

Sanju Samson च्या बदल्यात राजस्थानचा चेन्नईच्या तीन नावांवर विचार? कोणता एक खेळाडू संघात येणार? सर्वच हैराण

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

National Sports Awards : मोठी बातमी : यंदा कोणालाच खेलरत्न पुरस्कार नाही, 17 जणांना अर्जुन पुरस्कार, एकाही क्रिकेटपटूला एकही अवॉर्ड नाही, पाहा संपूर्ण यादी!
मोठी बातमी : यंदा कोणालाच खेलरत्न पुरस्कार नाही, 17 जणांना अर्जुन पुरस्कार, एकाही क्रिकेटपटूला एकही अवॉर्ड नाही, पाहा संपूर्ण यादी!
IND vs SL 1st Test DAY-4 Live : दुसऱ्या डावात टीम इंडिया 193 धावांवर ऑलआऊट! श्रीलंकेसमोर 372 धावांचं लक्ष्य; आता प्रत्येक चेंडू ठरणार निर्णायक, जाणून घ्या LIVE अपडेट्स
दुसऱ्या डावात टीम इंडिया 193 धावांवर ऑलआऊट! श्रीलंकेसमोर 372 धावांचं लक्ष्य; आता प्रत्येक चेंडू ठरणार निर्णायक, जाणून घ्या LIVE अपडेट्स
Rishabh Pant 100 sixes in Tests : अद्भूत, अविश्वसनीय...कसोटीत 100 षटकार ठोकणारा ऋषभ पंत पहिला भारतीय, तर जागतिक तिसरा क्रिकेटपटू; यादीत कुणाकुणाचा समावेश?
अद्भूत, अविश्वसनीय...कसोटीत 100 षटकार ठोकणारा ऋषभ पंत पहिला भारतीय, तर जागतिक तिसरा क्रिकेटपटू; यादीत कुणाकुणाचा समावेश?
IND vs SL 1st Test : आऊट देताच केएल मैदानाबाहेर निघाला, पडिक्कल म्हणाला, अरे थांब...; पुढे जे घडलं, ते पाहून सगळे हसत बसले, VIDEO
आऊट देताच केएल मैदानाबाहेर निघाला, पडिक्कल म्हणाला, अरे थांब...; पुढे जे घडलं, ते पाहून सगळे हसत बसले, VIDEO

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Embed widget