Ind vs Sa 2nd Test : गौतम गंभीरच्या 'त्या' हट्टाने भारतीय संघाच्या फलंदाजीची माती, सगळा ताळमेळ बिघडला, अनिल कुंबळेने खडे बोल सुनावले
Ind vs Sa 2nd Test Marathi News : मुख्य कोच गौतम गंभीरवर कसोटी क्रिकेटमधील भारताच्या घसरत्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहेत.

Anil Kumble Slams Poor India Batting Ind vs Sa 2nd Test : मुख्य कोच गौतम गंभीरवर (Gautam Gambhir) कसोटी क्रिकेटमधील भारताच्या घसरत्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहेत. एका वर्षाच्या घरच्या मैदानावर आता दुसरी कसोटी मालिका गमावण्याच्या उंबरठ्यावर भारतीय संघ उभा आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली आणि माजी कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी तयार केलल्या संघासह खेळताना भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकले होते. मात्र गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर (Ajit Agarkar) यांच्या कसोटी संघ निवडीवर आता टीका होत आहे. दरम्यान, अनुभवी फिरकी गोलंदाज आणि भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे (Anil Kumble) यांना घरच्या मैदानावर भारताच्या कामगिरीबद्दल चिंता आहे.
कोलकाता कसोटीमध्ये साई सुदर्शनला बाहेर ठेवून तिसऱ्या क्रमांकावर ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदरला पाठवण्याचा गंभीरने घेतलेला निर्णय सर्वांना चकित करणारा ठरला. नंतर गुवाहाटी सामन्यात पुन्हा सुदर्शनला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्यात आले आणि सुंदरला आठव्या क्रमांकावर ढकलण्यात आले. भारताच्या पहिल्या डावात सुंदरने खेळलेल्या लढवय्या खेळीवर माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी त्याच्या धैर्याचे कौतुक केले आणि त्याची खरी भूमिका टॉप ऑर्डरमध्ये असायला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे काय म्हणाले?
जिओहॉटस्टारवरील चर्चेत तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कुंबळे म्हणाले, “भारतातील बॅटिंग ऑर्डरकडे पाहिलं तर गेल्या तीन-चार वर्षांत टॉप पाचपैकी चार फलंदाज रिटायर झाले किंवा संघाबाहेर गेले. विराट कोहली, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा रिटायर झाले, तर अजिंक्य रहाणे अजून सक्रिय आहे. शुभमन गिलही या मालिकेत नव्हता. भारताने फक्त शुभमन या कर्णधाराचीच नव्हे, तर त्याच्या फलंदाजीचीही उणीव जाणवली. जेव्हा असे खेळाडू नसतात, तेव्हा स्थिर आणि सातत्यपूर्ण फलंदाजी क्रमाची गरज असते. खेळाडूंना पुरेशी संधी दिली पाहिजे.”
कुंबळे पुढे म्हणाले की, फलंदाजी क्रमात सतत होणारे प्रयोग खेळाडूंसाठी अस्थिरता निर्माण करतात. “हो, ते कधी चांगलं खेळतील, कधी नाही. पण सहा–सात किंवा आठ कसोटी सामन्यांपर्यंत त्यांना सातत्याने पाठिंबा दिला पाहिजे. गेल्या 10–12 कसोटी सामन्यांकडे पाहिलं तर टॉप ऑर्डरमध्ये खूप बदल झालेले दिसतात. ही सततची फेरबदल खेळाडूंसाठी नुकसानदायक ठरू शकते. हे सगळं पाहिल्यावर आणि इथला खेळ पाहून निराशा होते. अपेक्षा होती की दुसऱ्या डावात कामगिरी अधिक चांगली दिसेल.
हे ही वाचा -





















