Aus vs Ind 1st ODI : 3 वेगवान गोलंदाज, 2 फिरकीपटू तर.... पहिल्या वनडेमध्ये ही असणार टीम इंडियाची प्लेइंग-11, नितीश कुमार रेड्डीचं पदार्पण!
Australia vs India, 1st ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेचा पहिला सामना पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर खेळला जात आहे.

Australia vs India, 1st ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेचा पहिला सामना पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात नितीश कुमार रेड्डीला संधी देण्यात आली असून तो आपला पहिला वनडे सामना खेळत आहे. याशिवाय, रोहित शर्मा आणि विराट कोहलीही बर्याच काळानंतर पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मैदानात उतरले आहेत.
भारतीय कर्णधार शुभमन गिल काय म्हणाला?
भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीदरम्यान भारतीय कर्णधार शुभमन गिलला विचारण्यात आले की जर त्याने नाणेफेक जिंकली असती तर तो काय केला असता? गिलने उत्तर दिले की तो देखील प्रथम गोलंदाजी करायला प्राधान्य देईल.
A day he will never forget! ✨
— BCCI (@BCCI) October 19, 2025
It's a special moment for debutant Nitish Kumar Reddy, who receives his ODI cap from Rohit Sharma 🧢 🇮🇳
Updates ▶ https://t.co/O1RsjJTHhM#TeamIndia | #AUSvIND | @NKReddy07 pic.twitter.com/ZpJUaiQqC5
भारत-ऑस्ट्रेलिया संघांच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल जाणून घ्या
भारत : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिप (यष्टिरक्षक), मॅट रेनशॉ, कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड.
Mitchell Marsh has won the toss and Australia 🇦🇺 elect to field first.
— Star Sports (@StarSportsIndia) October 19, 2025
Nitish Reddy makes his ODI debut 🧢#AUSvIND 👉 1st ODI | LIVE NOW 👉 https://t.co/FkZ5L4CrRl pic.twitter.com/sc4BZzos5W
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आकडेवारी
एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा आहे. दोन्ही संघांमध्ये आजवर एकूण 152 वनडे सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 84 सामने ऑस्ट्रेलियाने तर 58 सामने भारताने जिंकले आहेत. भारतामध्ये झालेल्या 72 सामन्यांपैकी 34 सामने ऑस्ट्रेलियाने आणि 33 सामने भारताने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियात झालेल्या 54 सामन्यांपैकी 38 सामने कांगारूंनी आणि 14 सामने भारताने जिंकले आहेत. तटस्थ स्थळी झालेल्या 26 सामन्यांपैकी 11 भारताने आणि 12 ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. असा हा दोन्ही संघांचा ऐतिहासिक द्वंद्व पुन्हा एकदा रोमांचक ठरण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा -





















