एक्स्प्लोर

Abhishek Sharma : ज्याच्याकडून अपेक्षा होत्या, त्यानेच दिल्या जखमा; अभिषेक शर्माच्या नावे इतिहासातील 'काळा' रेकॉर्ड, नेमकं काय घडलं?

Abhishek Sharma Stats T20 World Cup 2026 : भारतीय संघाचा युवा फलंदाज अभिषेक शर्माच्या नावावर एक अत्यंत नकोसा आणि लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे.

Abhishek Sharma Stats T20 World Cup 2026 : भारतीय संघाचा युवा फलंदाज अभिषेक शर्माच्या नावावर एक अत्यंत नकोसा आणि लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात आपल्या पहिल्याच तीन डावांमध्ये शून्यावर बाद होणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. 18 फेब्रुवारी रोजी नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यातही तो खाते उघडण्यापूर्वीच माघारी परतला. यापूर्वी यूएसए आणि पाकिस्तानविरुद्धही त्याला धावफलक एक पण धाव लावता आली नव्हती.

अभिषेक शर्माच्या नावे इतिहासातील 'काळा' रेकॉर्ड  

टी-20 विश्वचषकातील कारकिर्दीच्या पहिल्या तीन डावांत 0 वर बाद होण्याची नकोशी हॅट्ट्रिक अभिषेकने केली आहे. त्याच्याआधी हा विक्रम आशीष नेहराच्या नावावर होता. नेहरा आपल्या टी-20 विश्वचषक कारकिर्दीतील पहिल्या दोन डावांत शून्यावर बाद झाला होता आणि त्याला स्पर्धेत एकही धाव करता आली नव्हती. मात्र अभिषेकने हा नकोसा विक्रम आणखी पुढे नेत तीन सलग शून्यांची नोंद केली आहे.

पुन्हा खाते उघडण्यापूर्वीच माघारी... 

अभिषेकसाठी हा पहिलाच टी-20 विश्वचषक आहे, पण सुरुवात अत्यंत निराशाजनक ठरली. यूएसएविरुद्ध तो गोल्डन डकचा बळी ठरला. पाकिस्तानविरुद्ध चार चेंडू खेळूनही त्याला धाव करता आली नाही. आता नेदरलँड्सविरुद्ध तिसऱ्याच चेंडूवर तो शून्यावर बाद झाला आणि त्याच्या नावावर शून्यांची हॅट्ट्रिक जमा झाली.

ही खराब मालिका फक्त विश्वचषकापुरती मर्यादित नाही. मागील सहा टी-20 डावांत अभिषेक चार वेळा शून्यावर बाद झाला आहे. या सहा डावांत त्याने केवळ एका अर्धशतकासह एकूण 98 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याची कामगिरी चिंतेचा विषय ठरत आहे. संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांना आता त्याच्याकडून दमदार पुनरागमनाची अपेक्षा आहे.

हे ही वाचा -

T20 World Cup 2026 Super 8 Schedule : 9 दिवसांत, 12 सामने... टी-20 विश्वचषक 2026 सुपर-8 चे वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान संघांचे सामने कधी?, जाणून घ्या सर्वकाही

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
IND vs SL : सिराज, कृष्णा, गुरनूर ब्रार, आकिब नबी, चारपैकी कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना प्लेईंग XI मध्ये संधी? अजिंक्य रहाणेचा महत्त्वाचा सल्ला
श्रीलंकेविरोधातील पहिल्या कसोटीत कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना संधी? अजिंक्य रहाणेनं दोघांची नाव सांगितली
Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget