एक्स्प्लोर

37th National Games 2023 : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच महाराष्ट्राचा जयजयकार! 80 सुवर्ण, 69 रौप्य, 79 कांस्य  

जिम्नॅस्टिकपटू संयुक्ता काळे सर्वोत्तम महिला क्रीडापटू ठरली.  सर्वाधिक सोनेरी यश मिळवत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अव्वल क्रमांकाच्या सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान संपादन करून देशात महाराष्ट्राची शान राखली.

पणजी : महाराष्ट्राने ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गुरुवारी 15 व्या दिवशी इतिहास घडवला. महाराष्ट्राने ८० सुवर्ण, ६९ रौप्य, ७९ कांस्य अशी एकूण विक्रमी २२८ पदके कमावली. तसेच सर्वाधिक सोनेरी यश मिळवत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अव्वल क्रमांकाच्या सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान संपादन करून देशात महाराष्ट्राची शान राखली. देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याकडून महाराष्ट्राला सर्वसाधारण चषक प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राच्या वतीने क्रीडामंत्री संजय बनसोडे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर आणि पथक प्रमुख स्मिता शिरोळे यांनी तो स्वीकारला. १९९४नंतर २९ वर्षांनी हे जेतेपद महाराष्ट्राने पटकावले. जिम्नॅस्टिकपटू संयुक्ता काळेने सर्वोत्तम महिला क्रीडापटूचा चषक पटकावला. 

यंदा गतविजेते सेनादल (६६ सुवर्ण, २७ रौप्य, ३३ कांस्य, एकूण १२६ पदके) दुसऱ्या आणि हरयाणा (६२ सुवर्ण, ५५ रौप्य, ७५ कांस्य, एकूण १९२ पदके) तिसऱ्या स्थानावर राहिले. महाराष्ट्राची जिम्नॅस्टिकपटू संयुक्ता काळे आणि पश्चिम बंगालच्या प्रणोती नायक यांना सर्वाधिक पदके जिंकल्याबद्दल सर्वोत्तम महिला क्रीडापटूचा पुरस्कार संयुक्तपणे देण्यात आला. कर्नाटकचा जलतरणपटू श्रीहरी नटराज सर्वोत्तम पुरुष क्रीडापटू ठरला. अखेरच्या दिवशी योगासनांमध्ये महाराष्ट्राने तीन सुवर्णपदके पटकावली. नेमबाज अभिज्ञा पाटीलने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात रुद्रांक्ष पाटीलचे पदक मात्र थोडक्यात हुकले. सायकलिंगमधील १२० किलोमीटर रोड रेसमध्ये सूर्या थाटूच्या सायकलचा अपघात झाल्यामुळे अपेक्षित पदक निसटले.

महाराष्ट्राकडून दिवाळी साजरी!
खेळाडूंच्या मेहनतीमुळे महाराष्ट्राला विक्रमी द्वीशतकी पदकांचा पल्ला गाठता आला. त्यामुळे ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा महाराष्ट्रासाठी अभूतपूर्व अशी ठरली. कारण आतापर्यंत या स्पर्धेच्या इतिहासात कोणत्याही संघाला 200पेक्षा अधिक पदके जिंकता आलेली नाहीत. म्हणूनच २२८ पदके जिंकून यंदा महाराष्ट्राने दिवाळी साजरी केली आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केली. 

पदकविजेत्या खेळाडूंना इनाम
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महाराष्ट्राच्या पदकविजेत्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांसाठी अनुक्रमे सात लाख रू., पाच लाख रू. आणि तीन लाख रुपये इनाम देण्यात येणार आहे, असे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी नमूद केले. 

योगासने - महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद
 
योगासने क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्राने गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी तीन सुवर्णपदकांची कमाई केली. महाराष्ट्र संघाने एकंदर ५ सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्य अशी ८ पदके जिंकून योगासन क्रीडा प्रकारांमध्ये सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.  रत्नागिरीच्या पूर्वा आणि प्राप्ती किनारे भगिनींनी महिलांच्या कलात्मक दुहेरी प्रकारात १२०.५ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. तसेच महिला तालबद्ध दुहेरी प्रकारात रौप्य पदक जिंकले. महिला सांघिक कलात्मक गटात महाराष्ट्राने एकूण १२१.९५ गुण मिळवून सोनेरी यश मिळवले. उत्तराखंडला रौप्य आणि गुजरातला कांस्य पदक मिळाले. पुरुष सांघिक कलात्मक गटात महाराष्ट्राने एकूण १३०.९४ गुण मिळवून रौप्य पदक प्राप्त केले. या संघात वैभव श्रीरामे, हर्षल चुटे, ओम वरदाई, मनन कासलीवाल, पवन चिखले यांचा समावेश होता. हरयाणाला सुवर्ण आणि राजस्थानला कांस्य पदक मिळाले. पुरुषांच्या तालबद्ध दुहेरी प्रकारात मनन कासलीवाल आणि ओम वरदाई यांनी १२५.२५ गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले. 

योगासनांमधील पदके  -
कलात्मक जोडी वैभव श्रीरामे आणि हर्षल चुटे (सुवर्ण) पूर्वा किनारे आणि प्राप्ती किनारे (सुवर्ण)  तालबद्ध जोडी मनन कासलीवाल आणि ओम वरदाई (सुवर्ण), पूर्वा किनारे आणि प्राप्ती किनारे (रौप्य)  कलात्मक गट छकुली सेलोकर, कल्याणी चुटे, प्राप्ती किनारे, पूर्वा किनारे, सृष्टी शेंडे (सुवर्ण) वैभव श्रीरामे, हर्षल चुटे, ओम वरदाई, मनन कासलीवाल, पवन चिखले (रौप्य)

नेमबाजी - अभिज्ञा पाटीलला सुवर्णपदक
  
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय नेमबाज अभिज्ञा पाटील महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात ‘सुवर्णलक्ष्य’ साधण्यात यशस्वी ठरली. पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात रुद्रांक्ष पाटीलचे पदक मात्र थोडक्यात हुकले. २५ मीटर पिस्तूलमध्ये कोल्हापूरच्या अभिज्ञाने पात्रता फेरीत ५८५ गुण मिळवून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत तिने ३५ गुण मिळवून बाजी मारली. अभिज्ञा रौनक पंडित यांच्याकडे नेमबाजीचे प्रशिक्षण घेते आहे. पंजाबच्या सिमरनप्रीत बी. हिला रौप्यपदक आणि हरयाणाच्या पायलला कांस्यपदक मिळाले. १० मीटर एअर रायफल प्रकारात रुद्रांक्ष पात्रता फेरीत ६३०.४ गुण मिळवत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. पण अंतिम फेरीत त्याला चौथ्या क्रमांकाचे २०८.१ गुण मिळाले. महाराष्ट्राचा शाहू माने ६२७.५ गुण मिळवल्याने पात्रता फेरीचा अडथळा ओलांडण्यात अपयशी ठरला.

सायकलिंग - सायकलच्या अपघातामुळे सूर्याचे पदक निसटले!
 
अहमदाबादच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या रोड सायकलिंगमधील सुवर्णपदक विजेत्या सूर्या थाटूकडून महाराष्ट्राला १२० किलोमीटर रोड रेसमध्ये सुवर्णपदकाची अपेक्षा होती. पण अपघातामुळे हे पदक निसटले. पिंपरी-चिंचवडचा सूर्या शर्यतीचे अखेरचे ७ किलोमीटरचे अंतर बाकी असताना अग्रेसर असलेल्या चार स्पर्धकांमध्ये होता. पण त्याच्या सायकलचा अपघात झाल्यानंतर त्यातून सायकल नीट करणे आणि सावरणे कठीण गेले. त्यामुळे हे पदक गमवावे लागले. “हा अपघात झाला नसता, तर रोड रेसमध्ये सूर्याने नक्की महाराष्ट्राला पदक जिंकून दिले असते,” अशी प्रतिक्रिया राज्याचे प्रशिक्षक मिलिंद झोडगे यांनी व्यक्त केली.
 
एकूण पदके
सुवर्ण : ८०
रौप्य : ६९
कांस्य : ७९
एकूण : २२८

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Umar Khalid Bail Denied: 'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, संतोष धुरी यांचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरींचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, भाजप प्रवेश ठरला

व्हिडीओ

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Umar Khalid Bail Denied: 'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, संतोष धुरी यांचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरींचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, भाजप प्रवेश ठरला
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
Embed widget