एक्स्प्लोर

पाकिस्तानपेक्षा अफगाणिस्तानची कामगिरी चांगली, सेमीफायनलमध्ये पोहचण्याची 32 टक्के शक्यता, पाहा नेमकं समीकरण

2023 World Cup Semi Finals chances : आधी इंग्लंड, मग पाकिस्तान आणि आता श्रीलंका.... अफगाणिस्ताननं तीन बलाढ्य प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवून यंदाचा विश्वचषक गाजवला

Afghanistan vs Sri Lanka, World Cup 2023 : आधी इंग्लंड, मग पाकिस्तान आणि आता श्रीलंका.... अफगाणिस्ताननं तीन बलाढ्य प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवून यंदाचा विश्वचषक गाजवला आहे. पुण्यातल्या एमसीए स्टेडियमवर सोमवारी झालेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं श्रीलंकेचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात अफगाणिस्तानच्या प्रभावी आक्रमणासमोर श्रीलंकेचा अख्खा डाव २४१ धावांत आटोपला होता. अफगाणिस्तानकडून फाझल हक फारुखीनं चार आणि मुजीब उर रहमाननं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. अफगाणिस्तानचा रहमानउल्लाह गुरबाज भोपळाही फोडू शकला नाही. पण त्यानंतर अफगाणी फलंदाजांनी प्रत्येक विकेटसाठी भक्कम भागीदारी रचून आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अफगाणिस्तानच्या इब्राहिम झादराननं ३९, रहमत शाहनं ६२, हशमत शाहिदीनं नाबाद ५८ आणि अझमत ओमरझाईनं नाबाद ७३ धावांची खेळी उभारली. अफगाणिस्ताननं तीन विजयांसह विश्वचषकाच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. तीन विजयासह अफगाणिस्तान संघाने सेमीफायनलचे आव्हान जिवंत ठेवलेय. पुढील तिन्ही सामन्यात अफगाणिस्तान संघाने विजय मिळवल्यास सेमीफायनलचे तिकिट मिळण्याची दाट शक्यता आहे. अफगाणिस्तानची सेमीफायनलमध्ये पोहचण्याची शक्यता 32 टक्के इतकी झाली आहे. पाकिस्तानपेक्षा अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे. पाकिस्तानला सेमीफायनलचे तिकिट मिळण्याची शक्यता फक्त सात टक्के इतकी आहे. तर गतविजेत्या इंग्लंडची सेमीफायनलमध्ये पोहचण्याची शक्यता फक्त 0.4 टक्के इतकी आहे. भारत सेमीफायनलमध्ये पोहचण्याची शक्यता 99.9 टक्के इतकी आहे. 

विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहचण्याची कोणत्या संघाची किती शक्यता ? 2023 World Cup Semi Finals chances:

भारत, India - 99.9%.
दक्षिण आफ्रिका, South Africa - 95%.
न्यूझीलंड, New Zealand - 77%. 
ऑस्ट्रेलिया, Australia - 75%.

अफगाणिस्तान, Afghanistan - 32%.
पाकिस्तान, Pakistan - 7%.
श्रीलंका, Sri Lanka - 7%.
नेदरलँड्स, Netherlands - 6%.
बांगलादेश, Bangladesh - 0.7%.
इंग्लंड, England - 0.4%.

यंदाच्या विश्वचषकात अफागणिस्तानची शानदार कामगिरी - 

अफगाणिस्तान संघाने यंदाच्या विश्वचषकात प्रभावी कामगिरी करत सर्वांची मने जिंकली आहेत. अफगाणिस्तान संघाने सहा सामन्यात तीन विजय मिळवले आहेत. यामध्ये त्यांनी गतविजेता इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यासारख्या विश्वचषक विजेत्या संघाचा पराभव केला आहे. अफगाणिस्तान संघावर क्रीडा विश्वातून कौतुकाचा वर्षाव पडत आहे. 

सेमीफायनलसाठी काय करावे लागेल  ? 

अफगाणिस्तानचे सेमीफायनलमध्ये पोहचण्याची 32 टक्के शक्यता आहे. पण त्यांच्यासाठी आव्हान खडतर आहे. त्यांना पुढील तिन्ही सामन्यात विजय मिळवायचा आहे. यामध्ये नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघाचा समावेश आहे. नेदरलँड्सविरोधात विजय मिळवला तरी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यासारख्या संघाला हरवणं थोडे कठीण आहे. पण क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. त्यामुळे अफगाणिस्तानच्या पुढील सामन्यांकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaPandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Embed widget