(Source: ECI/ABP News/ABP Majha)
11 Bowlers In 1 Innings : क्रिकेटच्या इतिहासात चमत्कार, अख्खी टीमच बॉलिंगला उतरली, वाचा नक्की काय घडलं?
सध्या चाहत्यांना क्रिकेटचा टी-20 फॉरमॅट खूप आवडतो. क्रिकेटमध्ये 20 षटकांचा खेळ सुरू झाला तेव्हा हा फलंदाजांचा खेळ जास्त आहे असे म्हटले जायचे.
World Cricket In Syed Mushtaq Ali T20 Trophy : सध्या चाहत्यांना क्रिकेटचा टी-20 फॉरमॅट खूप आवडतो. क्रिकेटमध्ये 20 षटकांचा खेळ सुरू झाला तेव्हा हा फलंदाजांचा खेळ जास्त आहे असे म्हटले जायचे. मात्र, अनेक वेळा गोलंदाजांनी आपल्या दमदार कामगिरीने प्रसिद्धी मिळवली आहे. दरम्यान, टी-20 क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीशी संबंधित एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले आहे. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे.
टी-20 क्रिकेटमध्ये सय्यद मुश्ताक अली टूर्नामेंटमध्ये हे दृश्य पाहायला मिळाले आहे. या स्पर्धेत शुक्रवार 29 नोव्हेंबर रोजी दिल्ली आणि मणिपूर यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्ली संघाच्या सर्व 11 खेळाडूंनी गोलंदाजी केली. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एका संघातील सर्व खेळाडूंनी गोलंदाजी केली आहे.
मणिपूर आणि दिल्ली यांच्यात मुंबईतील वानखेडे येथे झालेल्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार आयुष बडोनी याने संघातील सर्व 11 खेळाडूंना गोलंदाजी दिली. संघाचा यष्टिरक्षक बडोनी स्वतः होता. तोही कीपिंग ग्लोव्हज सोडून गोलंदाजी करायला आला आणि मग इतिहास घडला. दिल्लीने हा सामना 4 विकेटने जिंकला. आता या सामन्याची जगभरात चर्चा होत आहे.
*1 innings 🤝 11 bowlers*
— Kiran Ganpat Mahanavar (@kiranmaha4242) November 30, 2024
Delhi created history by becoming the first team to use 11 bowlers in a match in the *Syed Mushtaq Ali Trophy*
The rare occurrence took place during their match against Manipur at the Wankhede Stadium in Mumbai. pic.twitter.com/k380dgHSy3
दिल्लीच्या 11 गोलंदाजांनी केली गोलंदाजी
मणिपूरविरुद्धच्या या सामन्यात दिल्लीच्या सर्व 11 खेळाडूंनी गोलंदाजी केली. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. यापूर्वी कोणत्याही संघाने अशी कामगिरी केली नव्हती. दिल्लीच्या 11 गोलंदाजांनी गोलंदाजी केली. या काळात चार गोलंदाजांनी विकेट घेतल्या. कर्णधार आयुष बडोनीनेही एक विकेट घेतली.
प्रथम खेळल्यानंतर मणिपूर संघाला 20 षटकांत 8 विकेट्सवर केवळ 120 धावा करता आल्या. यानंतर दिल्लीची सुरुवात खुपच खराब झाली, मात्र सलामीवीर यश धुलने एका टोकाला उभे राहून 51 चेंडूत नाबाद 59 धावा करत संघाला विजयापर्यंत नेले. दिल्लीने 18.3 षटकांत 6 गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. कर्णधार बडोनीने 9 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 13 धावा केल्या.
हे ही वाचा -