एक्स्प्लोर
सचिनच्या बर्थडेला ऑस्ट्रेलियाचा खोडसाळपणा, फॅन भडकले
सचिन तेंडुलकरसोबत काल ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डॅमियन फ्लेमिंगचाही वाढदिवस होता. त्यामुळं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं फ्लेमिंगला शुभेच्छा देणं स्वाभाविक होतं.

मुंबई: क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस काल भारतासह जगभरात साजरा करण्यात आला. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाने खोडसाळपणा केला. सचिन तेंडुलकरसोबत काल ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डॅमियन फ्लेमिंगचाही वाढदिवस होता. त्यामुळं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं फ्लेमिंगला शुभेच्छा देणं स्वाभाविक होतं. पण क्रिकेट ऑस्ट्रेलियानं डॅमियन फ्लेमिंगला सोशल मीडियावरुन शुभेच्छा देताना, सचिन तेंडुलकरवर मात्र विनाकारण निशाणा साधला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं केलेल्या ट्विटमध्ये डॅमियन फ्लेमिंगनं सचिनचा त्रिफळा उडवला तो व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळं सचिनच्या चाहत्यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या या खोडसाळपणाला उत्तर म्हणून, भारतीय क्रिकेटप्रेमींनी सचिनने फ्लेमिंगची धुलाई केलेला व्हिडीओ शेअर केला. दुबईत झालेल्या तिरंगी मालिकेत सचिनने फ्लेमिंगला चौकार आणि षटकार ठोकत, सळो की पळो करुन सोडलं होतं. VIDEO:
VIDEO:Some @bowlologist gold from the man himself - happy birthday, Damien Fleming! pic.twitter.com/YcoYA8GNOD
— cricket.com.au (@CricketAus) April 24, 2018
How about This @CricketAus ?
A Classic cover drive as Birthday gift from one Birthday boy @sachin_rt to another Birthday boy @bowlologist! ???????? pic.twitter.com/TxF1v11UIr — शशांक (@iShhhshank) April 24, 2018
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















