एक्स्प्लोर
सायना नेहवालचं महिला एकेरीतलं आव्हान संपुष्टात
रिओ डि जिनेरिओ: भारताच्या सायना नेहवालचं रिओ ऑलिम्पिकमधलं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं. युक्रेनच्या मारिया यूलिटिनानं सायनाला हरवून भारतीयांच्या अपेक्षांना सुरूंग लावला.
जागतिक क्रमवारीत 61व्या स्थानावर असलेल्या यूलिटिनानं पाचव्या मानांकित सायनावर 18-21 19-21 अशी मात केली. सायनानं याआधी ब्राझिलच्या व्हिसेण्ट लोहायनीविरुद्ध सामना जिंकून विजयी सलामी दिली होती. तर यूलिटिनानंही लोहायनीला हरवलं होतं.
त्यामुळं ग्रूप जीमध्ये मारिया युलिटिनीनानं अव्वल स्थान मिळवून बाद फेरीत प्रवेश केला. तर सायनावर साखळी फेरीतूनच माघारी परतण्याची वेळ ओढवली.
दरम्यान, तिने रिओ ऑलिम्पिकमधील आजच्या खराब कामगिरीसाठी डाव्या गुडघ्यांना झालेली दुखापत असल्याचे सांगितलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement