एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2018 मधील पहिलं शतक गेलचं! लेकीला सेंच्युरी डेडिकेट
ख्रिस गेलने अवघ्या 63 चेंडूंमध्ये एक चौकार आणि अकरा षटकारांसह नाबाद 104 धावांची खेळी उभारली.
मुंबई : किंग्स इलेव्हन पंजाबचा सलामीचा फलंदाज ख्रिस गेल आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला पहिला शतकवीर ठरला. गेलने अवघ्या 63 चेंडूंमध्ये एक चौकार आणि अकरा षटकारांसह नाबाद 104 धावांची खेळी उभारली.
गेलने षटकारांची बरसात करत सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. मोहालीत रंगलेल्या या सामन्यात गेलने अवघ्या 63 चेंडूंमध्ये नाबाद 104 धावा ठोकल्या. गेलने आपला दबदबा कायम असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं.
गेलच्या खेळीमुळे पंजाबला वीस षटकांत तीन बाद 193 धावांची मजल मारता आली. गेलने लोकेश राहुलच्या साथीनं 53 धावांची आणि करुण नायरच्या साथीनं 85 धावांची भागीदारी रचली. त्यात प्रमुख योगदान हे ख्रिस गेलचंच होतं.
'अनेक जण म्हणाले माझं वय झालं, मात्र या सेंच्युरीनंतर मला काही बोलायची आवश्यकता आहे, असं वाटत नाही. हे शतक मी माझ्या लेकीला अर्पण करतो. उद्या तिचा वाढदिवस आहे' अशा भावना गेलने सामन्यानंतर व्यक्त केल्या.
आयपीएलमध्ये गेलची ही सहावी सेंच्युरी आहे. 2013 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना गेलने पुणे वॉरिअर्स इंडिया विरोधात 175 धावांची नाबाद खेळी केली होती, हा आयपीएलमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम गेलच्या नावे जमा आहे.
याशिवाय आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार (265), एका डावातील सर्वाधिक षटकार (पुणे संघाविरोधात 2013 मध्ये 17 षटकार), सर्वात जलद शतक (पुणे संघाविरोधात 2013 मध्ये 30 चेंडूंत शतक) हे विक्रमही गेलच्या नावे जमा आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement