एक्स्प्लोर
Advertisement
Childrens day special : बालदिनानिमित्त बच्चे कंपनीसाठी सायक्लोथॉनचं आयोजन; मुलांकडून गॅजेट न वापरण्याचं घेतलं वचन
Mumbai : लहानग्यांसाठी आयोजित या सायक्लोथॉनचा मार्ग मुंबईतल्या सांतक्रुझपासून ते जुहूपर्यंत असा एकूण पाच किलोमीटर इतका होता.
Childrens Cyclothon : मुंबईत बालदिनानिमित्त (Childrens day) सायक्लोथॉनच आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या काही काळात मुलांमध्ये सातत्याने विविध गॅझेट वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुलांना गॅझेट कमी वेळ वापरण्यासाठी प्रोत्साहन द्यावे या हेतून सूर्या हॉस्पिटलकडून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सायक्लोथॉनमध्ये 150 हून अधिक 2 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांचा सहभाग होता. यावेळी मुलांनी गॅझेट वापरणं सोडणार असं प्रॉमिसही दिलं.
मुंबईतल्या सांतक्रुझपासून ते जुहूपर्यंत असा हा पाच किलोमीटरपर्यंत सायक्लोथॉनचा मार्ग (Cyclothon) होता. यावेळी मुलांचा उत्साह वाढविण्यासाठी सीआयडी फेम अभिनेता आदित्य श्रीवास्तव आणि गायक अनु मलिक यांनी उपस्थिती लावली होती. सूर्या हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. भूपेंद्र अवस्थी यांनी सकाळी 6.30 वाजता सूर्या हॉस्पिटल्सपासून सुरु होणाऱ्या या सायक्लोथॉनला हिरवा झेंडा दाखवला. महामारीच्या काळात गॅजेट्स वापरण्याचा परिणाम मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्याचप्रमाणे मुलांच्यामध्ये गॅझेटच्या वापरातील धोक्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या पालकांच्यामध्येही या समस्यांबद्दल जाणीव व्हावी यासाठी सायक्लोथॉनसारख्या स्पर्धेचा आधार घेण्यात आला होता. यामध्ये मुंबई उपनगरातील अनेक पालकही आपल्या पाल्यासह यात सहभागी झाले होते. सायक्लोथॉन स्पर्धेदरम्यान मुलांचा उत्साह पाहून आम्हाला आनंद झाला अशी प्रतिक्रिया यावेळी काही पालकांनीही दिली आहे.
दरम्यान या स्पर्धेविषयी अधिकची माहिती देताना सूर्या हॉस्पिटल्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ भूपेंद्र अवस्थी आणि मुंबईचे फॅसिलिटी डायरेक्टर, डॉ भूवन डी. म्हणाले की, आमच्याकडे मुंबई, पुणे आणि जयपूरमध्ये दर्जेदार आरोग्य सेवा पुरवून जागतिक दर्जाच्या बालरोग सेवेचा वारसा आहे. आमचा विश्वास आहे की प्रत्येक मूल मौल्यवान आहे आणि सर्वोत्तम काळजी घेण्यास पात्र आहे आणि आम्ही डॉक्टर, परिचारिका आणि सपोर्ट स्टाफच्या आमच्या उत्साही टीममुळे हे शक्य झाल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच यावेळी या सायक्लथॉनमध्ये सहभाग घेतलेल्या बच्चे कंपनीने बरीच मजा आल्याचं सांगितलं. काही जणांनी 'आजपासून मी दररोज सायकल चालवीन आणि स्क्रीनवर कमीत कमी वेळ घालवीन' असं प्रॉमिस देखील दिलं.
हे देखील वाचा-
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
सिंधुदुर्ग
वर्धा
निवडणूक
Advertisement