एक्स्प्लोर

पाकिस्तानच्या विजयावर सेहवाग म्हणाला...

लंडन: सरफराज अहमदच्या पाकिस्ताननं टीम इंडियाचा 180 धावांनी धुव्वा उडवून पहिल्यांदाच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर झालेल्या अंतिम सामन्यावर पाकिस्ताननं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या सामन्यात पाकिस्ताननं भारताला विजयासाठी 339 धावांचं डोंगराएवढं लक्ष्य दिलं होतं. त्या लक्ष्याच्या दडपणाखाली टीम इंडियाचा अख्खा डाव अवघ्या 158 धावांत गडगडला.  भारताकडून हार्दिक पंड्यानं 76 धावांची खेळी करून एकाकी झुंज दिली. टीम इंडियाच्या अन्य दहा फलंदाजांनी मिळून केवळ 79 धावाच जमवल्या.  पाकिस्तानी संघावर शुभेच्छांचा वर्षाव दरम्यान, पाकिस्तानच्या या जबरदस्त विजयानंतर त्यांच्या संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग म्हणतो, "आजच्या जबरदस्त विजयाबद्दल पाकिस्तानचं अभिनंदन. चांगला खेळ केल्याने ते विजयाचे दावेदार होते. पाकिस्तानच्या क्रिकेटसाठी हा विजय महत्त्वाचा आहे. https://twitter.com/virendersehwag/status/876469647096205312 पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी म्हणतो, "ही कामगिरी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशातील चाहते कायमचे लक्षात ठेवतील. पाकिस्तानने ही चॅम्पियन्स ट्रॉफी संस्मरणीय केली" https://twitter.com/SAfridiOfficial/status/876464972875710465 इम्रान खान 1992 मध्ये पाकिस्तानला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार इम्रान खान म्हणाले, "चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या पाकिस्तानी संघाचं अभिनंदन. फखर झमानसारखा खेळाडू पाहाणं जबरदस्त होतं." https://twitter.com/ImranKhanPTI/status/876468275336462337 वसीम आक्रम पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम आक्रम म्हणतो, "शानदार! टीम ग्रीनचा विजय अविश्वसनीय आहे.  1992 चा वर्ल्डकप जिंकल्याची प्रचिती होत आहे. आनंद गगनात मावेनासा झालाय" https://twitter.com/wasimakramlive/status/876476660610105344 कुमार संगकारा श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा म्हणाला, "पाकिस्तानी संघ हिम्मत आणि विश्वासाने खेळले. त्यांनी अविश्वसनीय खेळ केला. https://twitter.com/KumarSanga2/status/876466500294631424
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 

व्हिडीओ

Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार
Ashish Shelar Majha Katta : ठाकरे की पवार, भाजपसोबत कोण येणार, राजकारणात नवा बॉम्ब : माझा कट्टा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
Embed widget