Champions Trophy 2025 equation : 'ब' गटातून सेमी फायनल कोण गाठणार? ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान की साऊथ आफ्रिका? जाणून घ्या समीकरण
Champions Trophy 2025 equation : 'ब' गटातून सेमी फायनल कोण गाठणार? ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान की साऊथ आफ्रिका? जाणून घ्या समीकरण

Champions Trophy 2025 equation : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आता 'अ' गटातून भारत आणि न्यूझीलंड जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. परंतु, ब गटातून सेमी फायनलसाठी क्वालिफाय होण्यासाठी अजूनही चूरस कायम आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे ब गटातील सेमीफायनला जाण्यासाठी चूरस पाहायला मिळत आहे. दरम्यान, अफगाणिस्तानने लाहोरच्या इंग्लंडचा पराभव करत घरचा रस्ता दाखवलाय. त्यामुळे आता ब गटातून सेमीफायनल कोण मजल मारू शकेल जाणून घेऊयात..

ऑस्ट्रेलियापुढे कोणते आव्हान?
इंग्लंडला पराभूत करुन आलेल्या अफगाणिस्तानविरोधात आता ऑस्ट्रेलियाचा सामना असणार आहे. हा कांगारुंचा शेवटचा सामना असेल. तर कांगारुंनी अफगाणिस्तानला पराभूत केले तर ऑस्ट्रेलिया ब गटात अव्वल स्थानी जाईल कारण त्यांचा नेट रन रेट दक्षिण आफ्रिकेपेक्षा जास्त असेल. मात्र, अफगाणिस्तानने जिगरबाज खेळ दाखवून पराभूत केले तर ऑस्ट्रेलियाला देखील घरचा रस्ता पाहावा लागू शकतो.
अफगाणिस्तान समोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सर्वोत्तम सामन्यात इंग्लंडला पराभूत करताना अफगाणिस्तानने दमदार कामगिरी केली. इब्राहिम झद्रानच्या 177 धावांच्या खेळीच्या साहाय्याने अफगाणने साहेबांचा पराभव केलाय आणि चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता दाखवलाय. आता, अफगाणिस्तानसाठी पुन्हा करा किंवा मरा चा सामना आहे. अफगाणिस्तानचा पुढचा सामना 28 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध असणार आहे. मात्र, हा सामना जिंकला तरच ते सेमीफायनला जाण्यासाठी पात्र ठरतील.
View this post on Instagram
दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला 107 धावांनी पराभूत करून आपला सलामीचा सामना जोरदारपणे जिंकला. पण त्यांचा पुढचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध रद्द करण्यात आला, त्यामुळे आफ्रिकेकडे आता शेवटचा सामना जिंकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. इंग्लंड मात्र,त्यांचे मनसुबे उधळून लावू शकतो. आफ्रिकेचा पुढचा सामना इंग्लंडविरोधात असणार आहे. आफ्रिकेला इंग्लंडविरोधात चांगल्या रनरेट ने सामना जिंकणे महत्त्वाचे ठरणार आहे, शिवाय अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्याकडे देखील आफ्रिकेचे लक्ष असेल.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या
AFG vs ENG : अफगाणिस्तानने सर्वांच्या झोपा उडवल्या, इंग्लंडला धू धू धूतलं, Ibrahim Zadran चं दमदार शतक, साहेबांनी दोन विकेट्सही गमावल्या























