एक्स्प्लोर
भारत-पाकिस्तान सामन्याआधी विराटची अनोखी आयडिया
लंडन : विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील वाद चर्चेत असताना, क्रिकेटचाहत्यांच्या नजरा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रविवारी होणाऱ्या महामुकाबल्यावर आहेत. कर्णधार विराट कोहलीला कोणत्याही परिस्थितीत आपल्या अभियानाची सुरुवात विजयाने करायची आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारतीय संघाचा पहिला सामना 4 जून रोजी एजबस्टनमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.
लेफ्ट आर्म पेसर मोहम्मद आमीरविरोधात रणनीती
विराट ब्रिगेडने पाकिस्तानी जलदगदी गोलंदाजांचं त्रिकुट (मोहम्मद आमीर, जुनेद खान आणि वहाब रियाज) यांचा सामना करण्यासाठी नवी युक्ती काढली आहे. विशेषत: डावखुरा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीरचा सामना करण्यासाठी हटके निर्णय घेतला आहे. विराटने सरावादरम्यान फिरकीपटू रवींद्र जाडेजाला आमीरप्रमाणेच वेगाने बॉल फेकण्यासाठी सांगितलं.
जाडेजाचं नवं रुप
भारत-पाकिस्तान सामन्याआधी अष्टपैलू रवींद्र जाडेजाचं नवं रुप पाहायला मिळालं. नेट्समध्ये जाडेजा जलदगती गोलंदाज बनून भारतीय गोलंदाजांना सराव देताना दिसला. विराट कोहलीने रवींद्र जाडेजाला मोहम्मद आमीरप्रमाणे गोलंदाजी करण्यास सांगितलं, जेणेकरुन भारताच्या फलंदाजांना पाकिस्तानविरोधात खेळताना फायदा मिळू शकेल.
भारतासाठी आमीर धोका ठरु शकतो
मागील वर्षीच मॅच फिक्सिंगमुळे घातलेल्या बंदीनंतर मोहम्मद आमीरची मागील वर्षीच सहा वर्षांनी पुनरागमन झालं होतं. पाकिस्तानच्या या वेगवान गोलंदाजामध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांना अडचणीत आणण्याची क्षमता आहे. 25 वर्षीय हा गोलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये पाकिस्तानला मोठे विकेट्स मिळवून देऊ शकतो. आमीरने 32 वन डे सामन्यात आतापर्यंत 50 विकेट्स घेतल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement