एक्स्प्लोर
वेस्टइंडिज दौऱ्यानंतर विराट अनुष्कासोबत न्यूयॉर्कमध्ये!

न्यूयॉर्क: वेस्टइंडिज दौऱ्याहून परतल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या सुट्टी एन्जॉय करण्यासाठी न्यूयॉर्कला गेला आहे. पण तिथे तो एकटाच गेलेला नसून त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील आहे. सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत असून यामध्ये विराट आणि अनुष्का सोबत असल्याचं दिसत आहे. त्यांचा हा फोटो न्यूयॉर्कमध्ये काढण्यात आला आहे. न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर दोघेही निवांतपणे भटकत असल्याच या फोटोमधून दिसत आहे.
दरम्यान, 26 जुलैपासून भारत श्रीलंकेच्या दौऱ्यावर असणार आहे. त्यामुळे सध्या विराटकडे बराच वेळ आहे. ही सुट्टी एन्जॉय करण्यासाठी विराट अमेरिकेत गेला आहे. तर अनुष्का शर्मा देखील IIFA 2017 साठी न्यूयॉर्कमध्ये गेली आहे. अनुष्कानं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन न्यूयॉर्कचे काही फोटोही शेअर केले आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























