एक्स्प्लोर
ब्रेट ली म्हणतो 'जगातला सर्वात महागडा ड्रिंक्समन मैदानात'
धर्मशाला : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला उजव्या खांद्याच्या दुखापतीमुळे धर्मशालाच्या चौथ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली असली तरीही तो मैदानापासून दूर राहू शकला नाही. विराटची प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याची खुमखुमी इतकी प्रचंड होती की, तो ड्रिंक्सच्या निमित्तानं मैदानात उतरला. कोहलीच्या या स्पिरीटवर दिग्गज क्रिकेटपटूंनीही स्तुतिसुमनं उधळली आहेत.
सुनील गावस्कर म्हणाले... बघा बघा भारतीय खेळाडूंसाठी पाणी घेऊन कोण आलंय? बारावा खेळाडू साक्षात विराट कोहली. गावस्करांच्या या कोटीवर ब्रेट लीनं चटकन दुसरी कोटी केली. अरे व्वा, जगातला सर्वात महागडा ड्रिंक्समन मैदानात उतरलेला दिसतो, असे उद्गार ब्रेट लीनं काढले आणि सारा समालोचन कक्ष हास्यकल्लोळात बुडाला.
आपल्या सहकाऱ्यांचं मनोबल उंचावण्यासाठी भारतीय कर्णधारानं स्वीकारलेल्या या भूमिकेचं स्टेडियममधल्या प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केलं.
विराट कोहलीनं ड्रिंक्सच्या निमित्तानं दाखवलेल्या संघभावनेचा हा क्षण आणि त्यावरच्या कॉमेण्ट्सना सोशल मीडियावरही बहार आलेली दिसली. धर्मशाला कसोटीच्या पहिल्या दिवशी ड्रिंक्सच्या निमित्तानं वारंवार मैदानात उतरणारा विराट कुलदीप यादवनं पहिली विकेट घेतल्यावरही खास त्याला शाबासकी देण्यासाठी पाणी घेऊन मैदानात उतरला होता. आता सांगा का नाही खुपणार ऑस्ट्रेलियन मंडळींना
भारताचा हा कर्णधार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement