एक्स्प्लोर
Advertisement
नेमारची विजयी किक, ब्राझिलला ऑलिम्पिकमध्ये पहिलंवहिलं सुवर्ण
रिओ द जनैरोः फुटबॉल स्टार नेमारच्या जबरदस्त खेळाच्या जोरावर ब्राझीलने रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. ब्राझीलने अंतिम सामन्यात जर्मनीवर पेनल्टी शूट आऊटमध्ये 5-4 असा विजय मिळवला.
हा सामना निर्धारित आणि अतिरिक्त वेळेत 1-1 असा बरोबरीत सुटला होता. मग पेनल्टी शूट आऊटमध्ये अखेरच्या किकवर नेमारने गोल झळकावून ब्राझीलचा 5-4 असा विजय निश्चित केला.
ब्राझिलचं ऑलिम्पिकच्या इतिहासातलं हे पहिलंच सुवर्णपदक ठरलं. पाचवेळच्या विश्वविजेत्या ब्राझिलला आजवर एकदाही ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकता आलेलं नव्हतं. ब्राझीलने 1984, 1988 आणि 2012 सालच्या ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यात धडक मारली होती, पण पराभवाचा सामना करावा लागला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement