एक्स्प्लोर
भारतीय बॉक्सर सचिन सिवाच ज्युनियर विश्वविजेता
सेंट पीटर्सबर्ग (रशिया) : भारताचा बॉक्सर सचिन सिवाच ज्युनियर विश्वविजेता ठरला आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन म्हणजे 'आयबा'च्या जागतिक युवा विजेतेपद स्पर्धेत सचिन सिवाचने सुवर्णपदकाची कमाई केली. रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
सचिन सिवाचनं 49 किलो गटाच्या फायनलमध्ये क्युबाचा राष्ट्रीय विजेता जोर्गे ग्रिननवर मात केली. सचिनने या सामन्यावर अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवून 5-0 असा विजय मिळवला.
जागतिक युवा विजेतेपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा सचिन सिवाच हा आजवरचा तिसराच भारतीय बॉक्सर ठरला. याआधी थोकचोम सिंग आणि विकास कृष्णनने सुवर्णपदकाची कमाई केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement