'भारतात क्रीडा क्षेत्रासाठी सर्वात उत्तम काळ', पंतप्रधानांच्या हस्ते 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचं उद्घाटन
FIDE Chess Olympiad 2022 : 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेला चेन्नईमध्ये सुरुवात होत असून या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.
PM Narendra Modi : बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 (Chess Olympiad 2022) स्पर्धेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज करण्यात आलं. यावेळी तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन, केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि एल. मुरुगन यांच्यासह एफआयडीई अर्थात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष अर्केडी वोर्कोव्हीच हे देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी या स्पर्धेच्या आयोजनाबाबत आनंद व्यक्त करत, 'ही स्पर्धा ‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा’दरम्यान होत असून बुद्धिबळाची सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा भारतात, बुद्धिबळाच्या मायदेशात होत आहे.' असंही ते म्हणाले.
44वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड ही स्पर्धा प्रथमच भारतात होत असून ही स्पर्धा अनेक गोष्टींची आणि अनेक विक्रमांची साक्षीदार असेल असा विश्वास देखील मोदी यांनी व्यक्त केला. तसंच भारतात क्रीडा क्षेत्रासाठी सध्या उत्तम काळ आहे. युवावर्गाची उर्जा आणि त्यांना सक्षम करणारे वातावरण यांचा योग्य मिलाफ साधल्याने भारतातील क्रीडा संस्कृती अधिकाधिक सशक्त होत आहे. असंही पंतप्रधान म्हणाले.
There could not have been a better place to host the 44th Chess Olympiad than Tamil Nadu, which is India's chess powerhouse. pic.twitter.com/w5tPJhjdNL
— Narendra Modi (@narendramodi) July 28, 2022
चेन्नई स्पर्धेसाठी सज्ज
दोन वर्षानंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा ऑफलाईन होत आहे. कारण मागील दोनही वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे ऑनलाईन पद्धतीने ही स्पर्धा पार पडली होती. पडलेली ही स्पर्धा यंदा ऑफलाईन चेन्नईत पार पडत आहे. बुद्धिबळमधील अव्वल दर्जाचे संघ रशिया आणि चीन या स्पर्धेत नसताना भारताला अधिक विजय मिळवण्याची संधी आहे. यावेळी खुल्या आणि महिला गटात भारताचे अ, ब आणि क असे तीन संघ सामिल झाले आहेत. तर स्पर्धेला कधी सुरुवात होईल, कुठे सामने पाहता येतील आणि संघ कसे आहेत. सर्व पाहूया...
कुठे रंगणार स्पर्धा?
चेन्नई, तामिळनाडू येथील ईस्ट कोस्ट रोडवर असलेल्या शेरेटन महाबलीपुरम रिसॉर्ट आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे सामने खेळवले जातील. बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण हे दूरदर्शनवर होणार असून Chessbase India and FIDE या युट्यूब चॅनेल्सवरही मोबाईलद्वारे तुम्ही सामने पाहू शकता.
कसा आहे भारतीय संघ?
'अ' खुला गट | 'ब' खुला गट | 'क' खुला गट |
विदित गुजराथी | डी. गुकेश | सूर्यशेखर गांगुली |
पी. हरिकृष्ण | आर. प्रज्ञानंद | एस. पी. सेतुरामन |
अर्जुन इरिगसी | निहाल सरिन | अभिजित गुप्ता |
के. शशिकिरण | रौनक साधवानी | कार्तिकेयन मुरली |
एसएल नारायणन | बी. अधिबन | अभिमन्यू पुराणिक |
'अ' महिला गट | 'ब' महिला गट | 'क' महिला गट |
डी. हरिका | सौम्या स्वामीनाथन | इशा करवडे |
कोनेरू हम्पी | वांटिका अगरवाल | साहिथी वर्षिनी |
आर. वैशाली | मेरी अॅन गोम्स | पी. व्ही. नंधिधा |
भक्ती कुलकर्णी | पद्मिनी राऊत | प्रत्युशा बोड्डा |
तानिया सचदेव | दिव्या देशमुख. | विश्वा वस्नावाला |
हे देखील वाचा-
- Commonwealth Games 2022 : 'मला विश्वास आहे, भारतीय खेळाडू संपूर्ण प्रयत्न करतील, माझ्याकडून सर्व संघाला शुभेच्छा' : पंतप्रधान मोदी
- Commonwealth Games 2022 : आजपासून रंगणार कॉमनवेल्थ स्पर्धा 2022, भारतीय खेळाडूंचे सामने कधी अन् कोणाशी? वाचा सविस्तर
- Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारत सज्ज, कधी होणार सामने, कुठे पाहाल स्पर्धा, वाचा सविस्तर