Pro Kabaddi League 2018 : बेंगलुरु बुल्सनं पटकावलं विजेतेपद
बेंगलुरू बुल्सला तीन कोटी रुपयांचं इनाम देऊन गौरवण्यात आलं. गुजरात फॉर्च्युनजायंट्सला 1 कोटी 80 लाख रुपयांच्या इनामावर समाधान मानावं लागलं.
मुंबई : रोहितकुमारच्या बेंगलुरु बुल्सनं गुजरात फॉर्च्युनजायंट्सवर 38-33 अशी मात करून, प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या मोसमाचं विजेतेपद पटकावलं आहे. बेंगलुरू आणि गुजरात संघांमधील अंतिम सामना मुंबईच्या वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात गुजरातनं पूर्वार्धात 16-9 अशी आघाडी घेतली होती.
बेंगलुरूनं उत्तरार्धात ती आघाडी मोडीत काढून, गुजरातवर पाच गुणांनी विजय साजरा केला. बेंगलुरूच्या पवन सेहरावतनं 25 चढायांमध्ये 22 गुणांची कमाई केली. पवनची हीच कामगिरी बेंगलुरुच्या विजयात निर्णायक ठरली.
बेंगलुरू बुल्सला तीन कोटी रुपयांचं इनाम देऊन गौरवण्यात आलं. गुजरात फॉर्च्युनजायंट्सला 1 कोटी 80 लाख रुपयांच्या इनामावर समाधान मानावं लागलं.
कबट्टी प्रो लीगच्या मागील मोसमातही गुजरातला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. गुजरात आणि बेंगलुरु हे दोन्ही संघ याआधी तीनवेळा आमनेसामने आले. त्यात एक सामना गुजरातने, एक सामना बेंगलुरूने जिंकला तर एक सामना अनिर्णित राहिला.