पाचव्या स्थानी रोहित शर्माचा नंबर आहे. रोहितला मानधन म्हणून 50 लाख रुपये मिळतात. तसेच चार कसोटी सामन्यांसाठी 20 लाख, पाच एकदिवसीय सामन्यांसाठी 10 लाख आणि 18 टी-20साठी 36 लाख रुपये दिले जातात. अशा प्रकारे तो वर्षाला 1.16 कोटी रुपये कमावतो.
2/6
या यादीत चौथ्या स्थानी अजिंक्य रहाणेचा क्रमांक आहे. त्याला एक कोटी मानधनासह 6 टेस्ट सामन्यांसाठी 42 लाख, चार एक दिवसीय सामन्यांसाठी 16 लाख आणि सात टी-20 सामन्यांसाठी 14 लाख रुपये मानधन दिले जाते. रहाणेला वर्षाला 1.72 कोटी रुपये मिळतात.
3/6
धोनीचा याच श्रेणीत समावेश असला तरी, तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. एक कोटी मानधन घेणाऱ्या धोनीने कसोटी क्रिकेटमधून या आधीच निवृत्ती घेतली आहे. त्याला 8 एक दिवसीय सामन्यांसाठी 32 लाख, तर 21 टी-20 सामन्यांसाठी 42 लाखांसाठी 1.74 कोटी रुपये मिळतात.
4/6
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने नुकतीच आपल्या खेळाडूंच्या माधनामध्ये वाढ केली असून कसोटी क्रिकेटमधील खेळाडूंना दुप्पट मानधन देण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूला 7 लाख रुपये मानधन दिले जात होते. मात्र आता त्यात आता वाढ झाली आहे. आज आम्ही तुम्हाला कोणत्या क्रिकेटपटूला किती मानधन मिळते हे तत्थ्यांच्या आधारे सांगणार आहोत.
5/6
बीसीसीआयच्या पहिल्या श्रेणीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. त्याला एका वर्षाला एक कोटी अधिक मानधन दिले जाते. तसेच त्याला चार कसोटी सामन्यांसाठी 42 लाख रुपये, पाच एक दिवसीय सामन्यांसाठी 20 लाख रुपये आणि 15 टी-20 सामन्यांसाठी 30 लाख रुपये दिले जातात. अशा प्रकारे विराटला वर्षाला 1.92 कोटी रुपये मिळतात.
6/6
याच श्रेणीत दुसऱ्या स्थानी फिरकीपटू आर. अश्विनचा नंबर आहे. त्यालाही एका वर्षाला एक कोटी मानधन मिळते. तसेच 6 कसोटीसाठी 42 लाख रुपये, दोन एक दिवसीय सामन्यांसाठी 8 लाख रुपये, 17 टी-20 सामन्यांसाठी 34 लाख रुपये मानधन मिळते. तो वर्षाला 1.84 कोटी रुपये कमावतो.