एक्स्प्लोर

बीसीसीआयचा वार्षिक करार जाहीर; धवन, भुवनेश्वर ए प्लस श्रेणीतून बाहेर

धवन आणि भुवनेश्वरसह टीम इंडियाच्या अकरा शिलेदारांचा ए श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. त्यात धोनी आणि रहाणेचाही समावेश असून, या अकरा जणांना वर्षाला पाच कोटी रुपयांचं मानधन देण्यात येईल.

मुंबई : टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज शिखर धवन आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला बीसीसीआयच्या कॉण्ट्रॅक्ट सिस्टीममधल्या ए प्लस श्रेणीतून वगळण्यात आलं आहे. तर फलंदाज रिषभ पंतला ए श्रेणी स्थान दिलं आहे. बीसीसीआयने गुरुवारी रात्री उशिरा टीम इंडियाच्या वार्षिक कराराची घोषणा केली. धवन आणि भुवनेश्वरसह टीम इंडियाच्या अकरा शिलेदारांचा ए श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. त्यात धोनी आणि रहाणेचाही समावेश असून, या अकरा जणांना वर्षाला पाच कोटी रुपयांचं मानधन देण्यात येईल. दुसरीकडे सर्वात वरच्या ए प्लस श्रेणीत तीन खेळाडू आहेत. कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमरा या तिघांनी ए प्लस श्रेणीतलं स्थान राखलं आहे. त्या तिघांना ऑक्टोबर 2018 ते सप्टेंबर 2019 या कालावधीसाठी सात कोटी रुपये मानधन देण्यात येईल. ए प्लस श्रेणी : विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह ए श्रेणी : आर. अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, एम एस धोनी, शिखर धवन, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, कुलदीप यादव, रिषभ पंत बी श्रेणी : केएल राहुल, उमेश यादव, युजवेंद्र चहल, हार्दिक पंड्या (या श्रेणीमधील खेळाडूंना वार्षिक 3 कोटी रुपये मिळतात) सी श्रेणी : केदार जाधव, दिनेश कार्तिक, अंबाती रायुडू, मनीष पांडे, हनुमा विहारी, खलील अहमद, रिद्धीमान साहा (या खेळाडूंना वार्षिक एक कोटी रुपये मानधन मिळणार) बीसीसीआयचा वार्षिक करार जाहीर; धवन, भुवनेश्वर ए प्लस श्रेणीतून बाहेर महिलांचं कॉण्ट्रॅक्ट महिलांच्या कॉण्ट्रॅक्टमध्ये ए श्रेणीत चार खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. मिताली राज, हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि पूनम यादव यांचा या यादीत समावेश आहे. महिलांच्या ए श्रेणीत सामील खेळाडूंना वार्षिक 50 लाख रुपये मानधन मिळतं. सी श्रेणीमध्ये 11 खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये राधा यादव, डी. हेमलता, अनुजा पाटील, वेदा कृष्णमूर्ती, मानसी जोशी, पूनम राऊत, मोना मेशराम, अरुंधती रेड्डी, राजेश्वरी गायकवाड, तान्या भाटिया, पूनम वस्त्राकर यांचा समावेश आहे. त्यांना वार्षिक 10 लाख रुपये मानधन मिळेल. ए श्रेणी : मिताली राज, हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, पूनम यादव सी श्रेणी : राधा यादव, डी. हेमलता, अनुजा पाटील, वेदा कृष्णमूर्ती, मानसी जोशी, पूनम राऊत, मोना मेशराम, अरुंधती रेड्डी, राजेश्वरी गायकवाड, तान्या भाटिया, पूनम वस्त्राकर

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 2nd TEST Day 4 Live : फॉलोऑनचा फास आवळला! श्रीलंकेचे 2 फलंदाज परतले, भारतापासून अजून इतक्या धावा दूर, जाणून घ्या LIVE अपडेट
फॉलोऑनचा फास आवळला! श्रीलंकेचे 2 फलंदाज परतले, भारतापासून अजून इतक्या धावा दूर, जाणून घ्या LIVE अपडेट
ICC Test Rankings : अरेरे बुमराहचं सिंहासन गेलं! मिचेल स्टार्क इतिहासात पहिल्यांदाच बनला नंबर-1; तर ऋषभ पंतचीही मोठी झेप, ICC रँकिंगमध्ये मोठा उलटफेर
अरेरे बुमराहचं सिंहासन गेलं! मिचेल स्टार्क इतिहासात पहिल्यांदाच बनला नंबर-1; तर ऋषभ पंतचीही मोठी झेप, ICC रँकिंगमध्ये मोठा उलटफेर
IND vs SL 2nd Test Shubman Gill : मागे पळत गेला, हवेत झेपावला अन् सामना फिरवला! शुभमन गिलने घेतला अद्भुत, अविश्वसनीय अन् भन्नाट कॅच, श्रीलंकेचे सगळे खेळाडू फक्त बघत बसले, पाहा VIDEO
मागे पळत गेला, हवेत झेपावला अन् सामना फिरवला! शुभमन गिलने घेतला अद्भुत, अविश्वसनीय अन् भन्नाट कॅच, श्रीलंकेचे सगळे खेळाडू फक्त बघत बसले, पाहा VIDEO
Asian Games 2026 Cricket Schedule : अय्यरपासून, सूर्यवंशी, सॅमसन, बुमराहपर्यंत... आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी टीम इंडिया सज्ज; कधी, कुठे, कोणाविरुद्ध भिडणार? Schedule जाहीर
अय्यरपासून, सूर्यवंशी, सॅमसन, बुमराहपर्यंत... आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी टीम इंडिया सज्ज; कधी, कुठे, कोणाविरुद्ध भिडणार? Schedule जाहीर

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत
Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय
Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिबेटमधून अचानक आलेल्या विनाशकारी महापुरात नेपाळमध्ये हाहा:कार; तब्बल 105 भारतीयांसह तब्बल 291 परदेशी पर्यटक बेपत्ता, जलविद्युत प्रकल्प, पुल, शेकडो कार वाहून गेल्या
तिबेटमधून अचानक आलेल्या विनाशकारी महापुरात नेपाळमध्ये हाहा:कार; तब्बल 105 भारतीयांसह तब्बल 291 परदेशी पर्यटक बेपत्ता, जलविद्युत प्रकल्प, पुल, शेकडो कार वाहून गेल्या
Pune News: गणेशोत्सवात लाऊडस्पीकरवर बंदी घाला; नारायण पेठेतील नागरिकाची मागणी, आता म्हणाले, मंडप टाकू नका, विसर्जन मिरवणुका रिंग रोडवरून काढा...
गणेशोत्सवात लाऊडस्पीकरवर बंदी घाला; नारायण पेठेतील नागरिकाची मागणी, आता म्हणाले, मंडप टाकू नका, विसर्जन मिरवणुका रिंग रोडवरून काढा...
Riteish Deshmukh and Genelia Viral Video: पत्नी जेनेलियासोबत सेल्फी काढण्यासाठी सुरक्षारक्षक जिन्यावरून पुढे आला अन् रितेशने मागे वळून येताच काय केलं? व्हिडिओ व्हायरल
Video: पत्नी जेनेलियासोबत सेल्फी काढण्यासाठी सुरक्षारक्षक जिन्यावरून पुढे आला अन् रितेशने मागे वळून येताच काय केलं? व्हिडिओ व्हायरल
वृक्षवल्ली आम्हा सोयरे; 10 व्या मजल्यावरुन महिला खाली पडली, झाडांमुळे वाचली; अग्निशमनच्या जवानांची तातडीने धाव
वृक्षवल्ली आम्हा सोयरे; 10 व्या मजल्यावरुन महिला खाली पडली, झाडांमुळे वाचली; अग्निशमनच्या जवानांची तातडीने धाव
Mumbai Rikshaw Issue : 'रिक्षा'च्या मुद्द्यावरून जुने शिवसैनिक आमने-सामने; संजय राऊतांचे आरोप, प्रताप सरनाईकांची 'सामना'मध्ये जाऊन चर्चेची तयारी
'रिक्षा'च्या मुद्द्यावरून जुने शिवसैनिक आमने-सामने; संजय राऊतांचे आरोप, प्रताप सरनाईकांची 'सामना'मध्ये जाऊन चर्चेची तयारी
नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस'समोर शेतकऱ्यांची उडी; प्रहारच्या नेत्याने दिल्लीला जाणारी रेल्वे थांबवली, पोलीस धावले
नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस'समोर शेतकऱ्यांची उडी; प्रहारच्या नेत्याने दिल्लीला जाणारी रेल्वे थांबवली, पोलीस धावले
Mumbai Local Train Accident: लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफमध्ये पक्षी अडकला, धूर निघायला लागताच प्रवाशी घाबरले अन्...
लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफमध्ये पक्षी अडकला, धूर निघायला लागताच प्रवाशी घाबरले अन्...
Nepal Flood: नेपाळमध्ये पुराचा हाहा:कार; 7 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आला समोर
नेपाळमध्ये पुराचा हाहा:कार; 7 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आला समोर
Embed widget