एक्स्प्लोर
ऑस्ट्रेलिया मालिकेपाठोपाठ भारत-न्यूझीलंड मालिकेचंही वेळापत्रक जाहीर
ऑस्ट्रेलिया मालिकेपाठोपाठ बीसीसीआयनं आज (शुक्रवार) न्यूझीलंड मालिकेचंही वेळापत्रक जाहीर केलं आहे.
मुंबई : ऑस्ट्रेलिया मालिकेपाठोपाठ बीसीसीआयनं आज (शुक्रवार) न्यूझीलंड मालिकेचंही वेळापत्रक जाहीर केलं आहे. ऑस्ट्रेलिया मायदेशी परताच न्यूझीलंड भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे बीसीसीआयनं दोन्ही मालिकांचं वेळापत्रक आजच जाहीर केलं.
ऑस्ट्रेलियासोबत पाच वनडे आणि तीन टी-20 सामने खेळणारा भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. या मालिकेआधी न्यूझीलंड भारत अ संघासोबत दोन सराव सामने मुंबईत खेळणार आहे.
वनडे मालिका वेळापत्रक
पहिली वनडे – 22 ऑक्टोबर (रविवार) : मुंबई
दुसरी वनडे – 25 ऑक्टोबर (बुधवार) : पुणे
तिसरी वनडे – 29 ऑक्टोबर (रविवार) : हा सामना नेमका कुठे होणार याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.
टी-20 मालिका वेळापत्रक
पहिला टी-20 सामना – 1 नोव्हेंबर (बुधवार) : नवी दिल्ली
दुसरा टी-20 सामना – 4 नोव्हेंबर (शनिवार) : राजकोट
तिसरा टी-20 सामना – 7 नोव्हेंबर (मंगळवार) : तिरुअनंतपुरम
संबंधित बातम्या :
भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचं वेळापत्रक जाहीर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement