एक्स्प्लोर
गॅरी कर्स्टन बांगलादेश संघाच्या सल्लागारपदी?
दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज गॅरी कर्स्टन याने बांगलादेश संघाच्या सल्लागार पदी असावं यासाठी त्याच्याशी बोलणी सुरु असल्याची माहिती बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ढाका : भारतीय संघाला 2011 चा विश्वचषक जिंकून देणारा प्रशिक्षक गॅरी कर्स्टन हा आपल्या संघासोबत असावा अशी इच्छा प्रत्येक देशाची आहे. बांगलादेशचीही सध्या तशीच इच्छा आहे. पुढील वर्षी होणारी विश्वचषक स्पर्धा लक्षात घेता बांगलादेशने आतापासूनच तयारी सुरु केली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज गॅरी कर्स्टन याने बांगलादेश संघाच्या सल्लागार पदी असावं यासाठी त्याच्याशी बोलणी सुरु असल्याची माहिती बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मागील बऱ्याच महिन्यांपासून बांगलादेश संघाच्या मुख्य प्रशिक्षकांच्या शोधात आहे. पण सध्या तरी त्यांनी कर्स्टन यांच्याशी सल्लागार पदासाठी बोलणी सुरु केली आहेत.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ते जलाल युनूस यांनी याबाबत बोलताना अशी माहिती दिली की, 'गॅरी कर्स्टन यांच्यासमोर आम्ही प्रशिक्षक पदाचा प्रस्ताव अद्याप ठेवलेला नाही.'
दरम्यान, श्रीलंकेत झालेल्या टी-20 तिरंगी मालिकेत बांगलादेशला फायनलमध्ये भारताकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे बांगलादेशने विश्वचषकासाठी आतापासूनच तयारी सुरु केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement