एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बांगलादेशची बलाढ्य ऑस्ट्रेलियावर मात
बांगलादेशनं कसोटी क्रिकेटमधला एक ऐतिहासिक विजय साजरा केला. बांगलादेशनं मिरपूर कसोटीत बलाढ्य ऑस्ट्रेलियावर वीस धावांनी मात केली.
मिरपूर : वेस्ट इंडिजनं लीडस कसोटीत इंग्लंडवर मिळवलेल्या विजयाला 24 तास व्हायच्या आत, बांगलादेशनं कसोटी क्रिकेटमधला एक ऐतिहासिक विजय साजरा केला. बांगलादेशनं मिरपूर कसोटीत बलाढ्य ऑस्ट्रेलियावर वीस धावांनी मात केली.
या कसोटीत बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 265 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. पण शकिब अल हसननं 85 धावांत पाच आणि तैजुल इस्लामनं 60 धावांत तीन विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाचा डाव 244 धावांत गुंडाळला.
शकिब अल हसननं पहिल्या डावात 84 धावांची खेळी आणि दोन्ही डावांत मिळून दहा विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी बजावून, बांगलादेशच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली.
- *बांगलादेश पहिला डाव : सर्वबाद 260 (तमीम 71, शाकीब 84)
- कमीन्स, लायन, अगर प्रत्येकी तीन विकेट
- ऑस्ट्रेलिया पहिला डाव : सर्वबाद 217 (रेनशॉ 45, अगर 41*)
- शाकीब 68/5 विकेट
- बांगलादेश दुसरा डाव : सर्वबाद 221 (तमीम 78), लायन 82/6 विकेट
- ऑस्ट्रेलिया दुसरा डाव : सर्वबाद 244 (वॉर्नर 112), शाकीब 85/5 विकेट
- निकाल - बांगलादेशचा 20 धावांनी विजय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement