Asian Games 2023 : गोल्डन बॉय पुन्हा चमकला, भालाफेकपटू नीरज चोप्राला सुवर्णपदक
Asian Games 2023 : आघाडीचा भालाफेकपटू नीरज जोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले.
Asian Games 2023 : आघाडीचा भालाफेकपटू नीरज जोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले. आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्रा याने कौतुकास्पद कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे.
नीरज चोप्रा 88.88 मीटर भालेफेक करत आघाडीवर राहिला. तर भारताचाच किशोर जेना दूसऱ्या क्रमांकावर राहिला. किशोरने 87.54 मीटर भालाफेक करत रौप्य पदकावर नाव कोरले. भारताच्या एकूण पदकांची संख्या
भारताचा आघाडीचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत गोल्ड मिळवले आहे. भालाफेकीत नीरज चोप्रा याने शानदार कामगिरी केली. नीरज चोप्राशिवाय भारताचा किशोर जेना यानेही दमदार परफॉर्म केला. रौप्य पदक पटकावत किशोर जेना याने पॅरिस ऑलम्पिकमध्ये पात्र झाला आहे.
नीरजने भालाफेकीत पहिल्या प्रयत्नाता 82.38 मीटर थ्रो केला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने 84.49 मीटर दूर थ्रो केला. चौथ्या प्रयत्नात नीरज याने 88.88 मीटर भाला फेकला. पाचव्या प्रयत्नात त्याने 80.80 मीटर थ्रो केला. तर जेना याने चौथ्या प्रयत्नात 87.54 मीटर थ्रो केला. किशोर जेना याने रौप्य पदकावर नाव कोरलेय.
Asian Games 2023 Live: 4x400 मीटर रिलेमध्ये रौप्य
भारतच्या महिला संघाने 4x400 मीटर रिले स्पर्धेत दमदार कामगिरी करत पदक मिळवले आहे. ऐश्वर्या, प्राची, शुभा आणि विथ्या यांनी शानदार कामगिरी करत रौप्य पदकावर नाव कोरले आहे.
अविनाश साबळेला आणखी एक पदक
बीडचा अविनाश साबळे याने आणखी एक पदक पटकावले आहे. साबळे याने 5000 मीटर स्पर्धेत रौप्य पदक मिळवले आहे. याआधी त्याने सुवर्णकामगिरी केली होती.
सुनील कुमारने जिंकले गोल्ड
हरमिलन बैंस हिने महिला 800 मीटर रेसमध्ये रौप्य जिंकले आहे. तर सुनील कुमार याने रेसलिंगमध्ये गोल्ड मेडल जिंकले आहे. त्याशिवाय स्क्वॉश बॉक्सिंग आणि रेसलिंगमध्ये 1-1 कांस्य जिंकले आहे.
𝑲𝒂𝒓 𝑯𝒂𝒓 𝑴𝒂𝒊𝒅𝒂𝒏 𝑭𝒂𝒕𝒆𝒉💪🏻#GOLD🥇 FOR THE G.O.A.T@Neeraj_chopra1 conquers #AsianGames2022 for the second time with a season best throw of 88.88!
— SAI Media (@Media_SAI) October 4, 2023
Take a bow King👑! You have done it💪🏻
Congratulations on your #HallaBol performance 🥳#Cheer4India#JeetegaBharat… pic.twitter.com/m7NhwV8o6X
जाकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेचा विक्रम भारताच्या खेळाडूंनी मोडीत काढला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताने 70 पदकांची कमाई केली होती. पण यंदा हा विक्रम मोडीत निघाला आहे. 17 सुवर्णपदकासह भारताने जवळपास 80 पदकांवर नाव कोरले आहे. यंदा भारत 100 पदकांचा आकडा पार करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.