एक्स्प्लोर

Asia Cup 2025: क्रिकेटशी मस्ती करायची नाही! लिटल मास्टर सुनील गावसकर गंभीर आणि कॅप्टन सूर्यावर का भडकले?

Asia Cup 2025: भारताने बांगलादेशवर विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. पण फलंदाजी क्रम बदलावर सुनील गावसकर यांनी कडक टीका केली.

Asia Cup 2025: आशिया कप टी-20 च्या अंतिम फेरीत (Asia Cup 2025 final India) टीम इंडियाने स्थान निश्चित केलं आहे. भारताने बांगलादेशला (India vs Bangladesh T20 Asia Cup) 41धावांनी हरवून स्पर्धेत सलग पाचवा विजय मिळवला. तथापि, सामन्यापूर्वी फलंदाजांच्या चुकांमुळे चिंता निर्माण झाली. फलंदाजी क्रमाचे परिणाम या सामन्यात स्पष्टपणे दिसून आले. सलामीवीर अभिषेक शर्माने 37 चेंडूत 75 धावा (Abhishek Sharma 75 runs Asia Cup) केल्या, परंतु त्याच्या बाद होण्यामुळे (12 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर) भारताची धावसंख्या 112/3 झाली. त्यानंतर, फलंदाजांनी वेग गमावला आणि भारत शेवटपर्यंत संघर्ष करत राहिला आणि केवळ 168/6 पर्यंत पोहोचला. या सामन्यात, शिवम दुबेला (Shivam Dube batting order controversy) अनपेक्षितपणे क्रमांक 3 वर बढती देण्यात आली, तिलक वर्माला क्रमांक 6 वर संधी देण्यात आली आणि संजू सॅमसनला 8 व्या क्रमांकावर असल्याने त्याला फलंदाजीची संधीही मिळाली नाही.

ज्या पद्धतीने फलंदाजीचा क्रम बदलला गेला तो घडायला नको होता

फलंदाजीमधील बदलावर India batting order experiments) लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir strategy criticism) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांना इशारा देत म्हटले, क्रिकेट मस्ती करण्यासाठी नाही. गावसकर यांनी (Sunil Gavaskar warning India team) हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, "क्रिकेट मनोरंजनासाठी नाही. ज्या पद्धतीने फलंदाजीचा क्रम बदलला गेला तो घडायला नको होता. 168 धावा पुरेशा नव्हत्या. बांगलादेश कदाचित लक्ष्याचा पाठलाग करू शकला नसता, पण एक मजबूत संघ भारतासाठी समस्या निर्माण करू शकला असता."

संजू सॅमसनच्या भूमिकेबद्दल कोणतीही स्पष्टता नाही

गावस्कर म्हणाले की, संघात संजू सॅमसनच्या भूमिकेबद्दल (Sanju Samson role in Team India) कोणतीही स्पष्टता नाही. शिवम दुबेला टॉप ऑर्डरवर पाठवणे हा योग्य निर्णय नव्हता आणि जास्त प्रयोग टाळले पाहिजेत. ते पुढे म्हणाले की, "तुम्ही संजू सॅमसनला ओपनिंगमधून काढून टाकले आणि त्याला यष्टीरक्षक केले. नंतर कधी त्याला 5व्या क्रमांकावर पाठवले, कधी फिनिशर म्हणून. शिवम दुबेचे काम 6 किंवा 7व्या क्रमांकावर येऊन 10 चेंडूत 20-25 धावा करणे आहे. पण तुम्ही त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले, जिथे तो जुळवून घेऊ शकला नाही आणि बाद झाला. माझ्या मते, इतके प्रयोग करणं योग्य नाही."

तर भारताची धावसंख्या आणखी कमी झाली असती

हार्दिक पंड्याने 29 चेंडूत 38 धावांची खेळी केली नसती तर भारताची धावसंख्या (India batting collapse Asia Cup 2025) आणखी कमी झाली असती. संजू सॅमसनला मात्र फलंदाजीची संधी मिळाली नाही, पण बांगलादेशविरुद्ध त्याचा प्रभावी विक्रम आहे. भारत-बांगलादेश टी-20 सामन्यात शतक करणारा तो एकमेव फलंदाज आहे. या खेळीदरम्यान हार्दिक पंड्याने बांगलादेशविरुद्ध 250 धावा केल्या. त्याच्या आठ डावांमध्ये 42.83 च्या सरासरीने एकूण 257 धावा आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
VB-G-RAM-G: लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
BMC Electin: मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar On Manikrao Kokate : अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला
Mahayuti Full PC : मुंबई शिवसेना-भाजपचा 150 जागांवर एकमत, नवाब मलिक यांच्यासोबत जाण्यास विरोध
Sushma Andhare PC : ड्रग्ज प्रकरणी अंधारेंचा गौप्यस्फोट, प्रकाश शिंदेंवर आरोप; स्फोटक पत्रकार परिषद
Pradnya Satav BJP : प्रज्ञा सातव यांचं दणदणीत भाषण, भाजपमध्ये प्रवेश का? सगळं सांगितलं..
Sanjay Raut PC : ...तर एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील, संजय राऊतांनी सगळंच काढलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
VB-G-RAM-G: लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
BMC Electin: मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
Savari Drugs Case : मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत व्हाया पुणे कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
Yavatmal Crime News: यवतमाळमध्ये अवैध वाळूची तस्करी; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर माफियाचा हल्ला, API ने थेट हल्लेखोरांवर केला गोळीबार
यवतमाळमध्ये अवैध वाळूची तस्करी; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर माफियाचा हल्ला, API ने थेट हल्लेखोरांवर केला गोळीबार
Payal Gaming Viral Video Controversy: सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा? पोस्ट करत म्हणाली...
सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा पायलचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा?
स्वार्थासाठी प्रज्ञा सातवांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला; स्थानिक कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेशावर सडकून प्रहार, वडेट्टीवार म्हणाले, 'पाच वर्ष आमदारकी शिल्लक होती तरीही..'
स्वार्थासाठी प्रज्ञा सातवांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला; स्थानिक कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेशावर सडकून प्रहार, वडेट्टीवार म्हणाले, 'पाच वर्ष आमदारकी शिल्लक होती तरीही..'
Embed widget