एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर मोठा विजय, अॅशेस 4-0ने जिंकली!

या कसोटीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 346 धावा केल्या होत्या.

सिडनी: ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर तब्बल 4-0 अशी मात करुन मानाच्या अॅशेस मालिकेवर नाव कोरलं. शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाची संयमी खेळी, मार्श बंधूंचं शतक आणि त्यानंतर कमिन्स आणि लियोनची जबरदस्त गोलंदाजी, यामुळे कांगारुंनी इंग्लंडवर एक डाव आणि 123 धावांनी पराभव केला. या कसोटीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 346 धावा केल्या होत्या. कर्णधार ज्यो रुट 83 आणि डेविड मलनच्या 62 धावा वगळता, अन्य फलंदाजांना मोठी खेळी करता आली नव्हती. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने 4 तर स्टार्क आणि हेजलवूडने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या. यानंतर मग ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभा केला. ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर मोठा विजय, अॅशेस 4-0ने जिंकली! डेव्हिड वॉर्नर 56, उस्मान ख्वाजा 171, स्टीव्ह स्मिथ 83, शॉन मार्श 156 आणि मिचेल मार्श 101 अशी टिच्चून फलंदाजी कांगारुंनी केली. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 7 बाद 649 धावांवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर पहिल्याच डावात तब्बल 303 धावांची आघाडी घेतली. यानंतर मग इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आला. आधीच खचलेला इंग्लंड संघ ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर तग धरु शकला नाही. शेवटच्या दिवशी इंग्लंडने 4 बाद 93 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. मात्र कर्णधार ज्यो रुट फलंदाजीला उतरला नाही. जॉनी बेयरस्टो आणि मोईन अली हे मैदानात उतरले. पण नॅथन लायनने मोईन अलीला 13 धावांवर माघारी धाडलं. यानंतर मग ज्यो रुटला मैदानात उतरावं लागलं. रुटने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. लंचपर्यंत इंग्लंचा अर्धा संघ तंबूत परतला होता. उपहाराला खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने 5 विकेट गमावल्या होत्या, मात्र रुटने बेयरस्टोच्या साथीने 58 धावा केल्या होत्या. मात्र उपहारानंतर रुट फलंदाजीला आलाच नाही. इंग्लंडचा दुसरा डाव 180 धावात गुंडाळला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि 123 धावांनी विजय मिळवला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
Ahmednagar News : 'धार्मिक स्थळाजवळ मद्य अन् मांस विक्रीच्या दुकानांना निर्बंध घालावेत', अहमदनगरच्या वारकऱ्यांची मागणी, विखे पाटील म्हणाले...
'धार्मिक स्थळाजवळ मद्य अन् मांस विक्रीच्या दुकानांना निर्बंध घालावेत', अहमदनगरच्या वारकऱ्यांची मागणी, विखे पाटील म्हणाले...
Sadabhau Khot : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
Pune Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Gadkari Sangli : मुंबई-पुणे-बंगळूर महामार्ग बांधणार, पाच ठिकाणी उतरणार विमानRamRaje Nimbalkar Join NCP | तुतारी हाती घ्यायची का? असं विचारताच कार्यकर्त्यांचा एकच जल्लोषRaj Thackeray Nashik : मनसेच्या 500 पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे देणार कानमंत्रएबीपी माझा हेडलाईन्स : Abp Majha Headlines : 07 AM 06 October 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
Ahmednagar News : 'धार्मिक स्थळाजवळ मद्य अन् मांस विक्रीच्या दुकानांना निर्बंध घालावेत', अहमदनगरच्या वारकऱ्यांची मागणी, विखे पाटील म्हणाले...
'धार्मिक स्थळाजवळ मद्य अन् मांस विक्रीच्या दुकानांना निर्बंध घालावेत', अहमदनगरच्या वारकऱ्यांची मागणी, विखे पाटील म्हणाले...
Sadabhau Khot : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
Pune Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
IND W vs PAK W : भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये हायव्होल्टेज लढत, हरमनप्रीत कौरपुढं करो वा मरो स्थिती
भारतापुढं करो या मरो स्थिती, पाकिस्तानवर विजय मिळवावा लागणार, हरमनप्रीत कौरच्या टीमपुढं मोठं आव्हान  
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
Akola Crime: अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Embed widget