एक्स्प्लोर
विराटच्या बर्थडे सेलिब्रेशनला अनुष्काची हजेरी
राजकोट: टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने काल आपला 28 वा वाढदिवस साजरा केला. टीम इंडियाच्या सदस्यांनी राजकोटमधील हॉटेलमध्ये विराटसोबत केक कापून त्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याची कथित प्रेयसी अनुष्का शर्मानेही हजेरी लावली.
विराटचा आज वाढदिवस असल्याने टीम इंडियाचा सलामीवीर गौतम गंभीर, इशांत शर्मा, जयंत यादव, आमित मिश्रा आदींनी राजकोटमधील हॉटेलमध्ये त्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी विराटचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याची कथित प्रेयसी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही हजेरी लावली.
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मीडिया मॅनेजर हिमांशू शाह यांनीच अनुष्का शर्मा इम्पिरियल हॉटेलमध्ये आल्याचे सांगितले. यावेळी टीम इंडियाच्या इतर खेळाडूंनीही विराटचा बर्थडे मोठ्या उत्साहात साजरा केला.
भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला 9 नोब्हेंबरपासून सुरु होत आहे. या मालिकेसाठी पहिला सामना राजकोटमध्ये होणार असून, टीम इंडिया नुकतीच राजकोटमध्ये पोहोचली.
संबंधित बातम्या
विराटचं टीम इंडियासोबत बर्थ डे सेलिब्रेशन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement