एक्स्प्लोर
Advertisement
World Cup 2019 : पाकिस्तानचा 'तो' खेळाडू म्हणतो हार्दिक पंड्याला माझ्या प्रशिक्षणाची गरज
आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल (गुरुवारी) झालेल्या सामन्यात मधल्या षटकांमध्ये भारताची धावगती खूपच धिमी झाली होती. परंतु हार्दिक पंड्या मैदानात उतरल्यानंतर त्याने चांगली फटकेबाजी केली. त्याने आणि धोनीने अंतिम षटकात केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला 250 धावांचा टप्पा पार करता आला.
लंडन : आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल (गुरुवारी) झालेल्या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 125 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह भारतानं विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. भारताने हा सामना गोलंदाजांमुळे जिंकला असला तरी टीम इंडियाच्या फलंदाजांनीदेखील या सामन्यात बरी कामगिरी केली होती. कर्णधार विराट कोहली, एमएस धोनी आणि हार्दिक पंड्यांच्या फलंदाजीच्या जोरावार भारताने विंडीजसमोर 268 धावा उभारल्या होत्या.
मधल्या षटकांमध्ये भारताची धावगती खूपच धिमी झाली होती. परंतु हार्दिक पंड्या मैदानात उतरल्यानंतर त्याने चांगली फटकेबाजी केली. त्याने आणि धोनीने अंतिम षटकात केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला 250 धावांचा टप्पा पार करता आला. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने 82 चेंडूत 72, धोनीने 61 चेंडूत 54 आणि पंड्याने 38 चेंडूत 46 धावा केल्या होत्या. अष्टपैलू हार्दिक पंड्याने गोलंदाजी करताना 5 षटकांत 28 धावा देत 1 बळीदेखील मिळवला.
हार्दिक पंड्याने वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली असली तरी, पाकिस्तानचा माजी क्रिकेटर अब्दुल रज्जाक मात्र त्याच्यावर नाराज आहे. हार्दिकच्या खेळात अनेक त्रुटी असल्याचे त्याने म्हटले आहे. त्यामुळे हार्दिकला चांगल्या प्रक्षिक्षणाची गरज असून मी त्यासाठी तयार असल्याचेही रज्जाकने म्हटले आहे.
रज्जाकने ट्विटरवर म्हटले आहे की, 'हार्दिक पंड्याला मी खेळताना पाहिले, त्याच्या खेळीत अनेक त्रुटी असल्याचे मला जाणवले. त्याचा बॉडी बॅलेंस चुकीचा आहे. हार्दिकला त्याच्या फुटवर्कवर काम करण्याची गरज आहे. त्याला माझ्या मार्गदर्शनाची गरज आहे. मी त्याला प्रशिक्षन देऊन जगातला सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू बनवू शकतो. बीसीसीआयला तसे वाटत असल्यास त्यांनी मला सांगावं, मी त्यासाठी तयार आहे. VIDEO | पाहा काय म्हणाला अब्दुल रज्जाकSo today I have been closely observing Hardik pandya and I feel like I see a lot of faults in his body’s balance when hitting the bowl hardly and I observed his footwork aswell and I see that also let’s him down sometimes and I feel like if I give him Coaching in for example UAE
— Abdul Razzaq (@ARazzaqPak) June 27, 2019
भारताच्या जर्सीमध्ये भगवा रंग आहे मग हिरवा का नाही? -अबू आझमी | मुंबई | ABP MajhaAbdul Razzaq "give me 2 weeks and I will make Hardik Pandya the world's best all-rounder" #Cricket pic.twitter.com/o3eIt69nfN
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) June 27, 2019
टीम इंडियाच्या कामगिरीवर मालवणी आणि कोल्हापुरीत विश्लेषण | ABP MajhaI can make him one of the best all rounders if not the best and if BCCI wants to make him a better all rounder I will always be available. Thanks
— Abdul Razzaq (@ARazzaqPak) June 27, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement