एक्स्प्लोर
ऑस्ट्रेलियाचा लंकेवर दणदणीत विजय, फिन्चचं 18 चेंडूत अर्धशतक!
दम्बुला: दम्बुलाच्या चौथ्या वन डेत ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवला आणि पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर अॅरॉन फिन्चनं 19 चेंडूत 55 धावांची धुवाँधार खेळी केली.
ऑस्ट्रेलियाकडून वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाशी फिन्चनं बरोबरी केली आहे. याआधी ऑस्ट्रेलियाकडून साइमन ओ'डोनेलनं 1990 मध्ये शारजात 18 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. त्यांच्या विक्रमाशी फिन्चनं बरोबरी केली आहे.
दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या जॉन हॅस्टिंग्सनं सहा फलंदाजांना माघारी धाडून श्रीलंकेचा डाव 50 षटकांत अवघ्या 212 धावांत गुंडाळला. मग विजयासाठीच्या 213 धावांचा पाठलाग करताना तर जॉर्ज बेलीनं 85 चेंडूंत अकरा चौकार आणि एका षटकारासह नाबाद 90 धावा करुन ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement